सोनी मराठी वाहिनी विविध कार्यक्रमांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करते. निरनिराळ्या मालिकांमधून प्रेक्षकांचे सतत मनोरंजन करत असते. “आशीर्वाद तुजा एकविरा आई” या मालिकेतून एकविरा आई चा महिमा आणि तानिया ची एकविरा आई वर असलेली नितांत भक्ती आजपर्यंत पाहायला मिळाली. मालिकेत तानिया आता कोळीवाड्यात पोहचली आहे. शिवा ची साथ तिला सुरवातीपासूनच लाभली आहे. (Aashirwad Tuza Ekvira Aai)
कोळीवाड्यात आपले अस्तित्व पुढे घेऊन जाण्यासाठी आणि भिमाई चा शोध घेण्यासाठी तानी कोळीवाड्यात परत येते. तिला शिवा यासाठी मदत करतो. ते दोघे मंदिरात जाऊन लग्न करतात आणि शिवा राणीला घेऊन कोळीवाड्यात पुन्हा येतो. आता कोळीवाड्यात पाणी आणि शिवा एकत्र आहेत आणि कोळीवाड्यात धुमधडाक्यात त्यांचा लग्नसमारंभ होणार आहे.

कोळीवाड्यातील लग्न आपल्याला या मालिकेतून पाहायला मिळणार आहे. विशेष म्हणजे संपूर्ण कोळीवाडा या लग्नासाठी उपस्थित राहणार आहे. हळद,डान्स, लग्न समारंभ अशा सगळे विधी प्रेक्षकांना कोळीवाड्यात पाहायला मिळतील. महत्वाची गोष्ट म्हणजे सगळ्यांचे आवडते गायक दादूस म्हणजेचच संतोष चौधरी या लग्नात विशेष गाणे गाताना दिसणार आहेत.
नक्कीच संपूर्ण कोळीवाडा आणि घर बसल्या सगळे प्रेक्षक बसल्या जागी नाचतील शंका नाही. दादूस च्या येण्याने कोळीवाड्यात वेगळीच धूम असेल. रेणुका सुद्धा ताणीसोबत आपल्याला या लग्नात दिसेल. ती नेहमीच तानीच्या सोबत आहे आणि तिच्या आशीर्वादाने तानी आपले काम करू शकेल का हे पाहायला मिळेल. तानी आणि शिवा च्या लग्नात किती धमाल असेल हे तुम्हाला पाहायला मिळेल विशेष महाएपिसोड भागात. ४ जून रविवार रात्री ८ वाजता सोनी मराठी वाहिनीवर .(Aashirwad Tuza Ekvira Aai)