रविवार, जून 8, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

बॉलिवूडमध्ये गायकांना मिळते कवडीमोल रक्कम, सुप्रसिद्ध गायकानेच आणलं सत्य समोर, म्हणाला, “पैसे मागितले तर…”

Saurabh Moreby Saurabh More
ऑक्टोबर 18, 2024 | 12:02 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bollywood popular playback singer Divya Kumar commented on the remuneration see the details

बॉलिवूडचा लोकप्रिय संगीतकार दिव्य कुमारचे गायकांच्या मानधनाविषयी भाष्य

दिव्य कुमार हे चित्रपट संगीतातलं मोठं नाव आहे. हिंदी मराठी चित्रपटांसह त्यांनी दाक्षिणात्य चित्रपटांमध्येही अनेक हिट गाणी गायली आहेत. दिव्य कुमार यांच्या गाण्यांवर अनेक रसिक मंडळी आजही मंत्रमुग्ध होतात. ‘सुन साथिया’, ‘जी करदा’, ‘वंदे मातरम्’, ‘मनोहारी’ यांसह अनेक गाण्यांना त्याचा आवाज लाभला आहे. आपल्या आवाजाने व सुमधुर वाणीने सर्वांना मंत्रमुग्ध करणाऱ्या दिव्य कुमारने नुकतेच गायकांच्या मानधनाविषयी भाष्य केलं आहे. दिव्य कुमारने ‘एबीपी’शी खास बातचीत करताना वेगवेगळ्या प्रश्नांना दिलखुलास उत्तरे दिली. यावेळी त्यांनी गायकांच्या कार्यपद्धतीबद्दल व त्यांच्या मानधनाबद्दल भाष्य केलं.

याबद्दल दिव्य कुमारने असं म्हटलं की, “१००० कोटी किंवा ५०० कोटी रुपयांच्या चित्रपटात अनेक कलाकारांना भरपूर पैसे मिळतात, असे जर तुम्हाला वाटत असेल तर तसे नाही. त्यातून मोठी रक्कम मोठे अभिनेते आणि दिग्दर्शक घेऊन जातात. जेव्हा कॉस्ट कटिंगचा विचार केला जातो तेव्हा सर्वप्रथम गायक आणि संगीतकारांचे पैसे कमी होतात. ही कलावंताची मोठी कोंडी आहे. तुमचे नाव मोठे असूनही चांगले पैसे मागितले तर तुम्हाला ते मिळू शकते, पण कधी कधी तुम्हाला सहज नकार दिला जातो”.

View this post on Instagram

A post shared by Divya kumar (@aslidivyakumar)

आणखी वाचा – Bigg Boss फेम अभिजीत सावंतने सुरु केलं व्लॉगिंग, बायकोबरोबरचा मजेशीर व्हिडीओ व्हायरल

यापुढे त्याने असं म्हटलं की, “बॉलिवूडमध्ये अशी चांगली माणसे आहेत, जी आपली काळजी घेतात, अशी माणसे कमी आहेत पण आहेत. हे लोक तुम्हाला चांगले पैसे देतात कारण ते गुणवत्तेशी तडजोड करत नाहीत. त्यांना गाणं गाण्यासाठी मी किंवा अरिजित हवा असेल तर ते आमच्याकडूनच गाणं गाऊन घेतात आणि त्याचे चांगले पैसेदेखील देतात. अजूनही आपण आपल्या मनात एक विशिष्ट रक्कम ठरवतो की, आपल्याला इतके पैसे मिळायला हवे. तथापि, त्यातदेखील निश्चितपणे सौदेबाजी आहे. मात्र, कोणाला किती पैसे मिळाले याचा खुलासा कधीच होत नाही”.

आणखी वाचा – सुखी संसाराची २५ वर्षे! लग्नाच्या वाढदिवसाला डॉ. नेनेंकडून माधुरी दीक्षितचं तोंडभरुन कौतुक, Unseen फोटो समोर

यापुढे दिव्य कुमारने असं म्हटलं की, “आजही असे अनेक गायक आहेत ज्यांची नावं मोठी असूनही ते केवळ ५० हजार ते १ लाख रुपये कमवू शकतात. बॉलिवूडमध्ये पैसे कमावण्यासाठी गाणं गाणे खूप अवघड आहे आणि हे आजचे नाही तर ९० च्या दशकातही हे होतंच. तुम्ही लाइव्ह परफॉर्म न केल्यास, तुमची कमाईची क्षमता मोठ्या प्रमाणात कमी होते. जाहिरातींचे जग बॉलिवूडपेक्षा चांगले आहे. कारण छोट्या जाहिरातींमध्ये एका ओळीच्या जिंगल्स गाण्यासाठीही ते खूप सन्माननीय रक्कम देतात. म्हणूनच जाहिरातीमध्ये गाणे हे मला आवडते”. 

Tags: bollywood singerDivya KumarDivya Kumar Remuneration
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Radhika Merchant Birthday Video

अंबानींच्या सूनेचा लग्नानंतरचा पहिला वाढदिवस, घरामध्येच मोठी पार्टी, बॉलिवूडकरांची गर्दी अन्…; आतमध्ये नक्की काय घडलं?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.