रविवार, जून 8, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

KBC मध्ये ५० लाखांसाठी सांगलीच्या मुलाला विचारण्यात आला ‘तो’ प्रश्न, पण दिलं चुकीचं उत्तर, तुम्हाला उत्तर माहित आहे का?

Saurabh Moreby Saurabh More
ऑक्टोबर 16, 2024 | 8:00 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Kaun Banega Crorepati 16 Physically able Prashant Jamdade participated in the show and he won Rs. 25 lakhs.

'कौन बनेगा करोडपती १६' मध्ये शारीरिक क्षमता असलेल्या प्रशांत जमदाडे यांनी सहभाग घेत २५ लाख रुपये जिंकले.

टीव्हीवरील काही लोकप्रिय कार्यक्रमांपैकी एक म्हणजे ‘कौन बनेगा करोडपती’. हा कार्यक्रम गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे त्याचबरोबर त्यांच्या ज्ञानातही भर घालत आहे. या कार्यक्रमात येणारे अनेक स्पर्धक ही त्यांची काही स्वप्ने घेऊन येतात आणि या मंचावरून त्यांच्या स्वप्नपूर्तीकडे प्रवास करतात. नुकत्याच झालेल्या एका भागात महाराष्ट्राचे प्रशांत जमदाडे हॉट सीटवर बसले. शारीरिक आव्हाने असूनही, त्यांनी २५ लाख रुपये इतकी किंमत जिंकली.  ज्याचा वापर ते त्यांच्या उपचारासाठी आणि त्याच्या कुटुंबाला मदत करण्यासाठी वापरणार आहेत. मात्र, ५० लाख रुपयांच्या प्रश्नाचे ते बरोबर उत्तर देऊ शकले नाहीत आणि त्यामुळे त्यांना शोमधून बाहेर पडावे लागले. (Kaun Banega Crorepati 16)

‘कौन बनेगा करोडपती १६’ च्या नुकत्याच झालेल्या भागात प्रशांत यांनी त्यांच्या संगोपनात आजोबांनी बजावलेल्या महत्त्वाच्या भूमिकेबद्दल सांगितले. यावेळी त्यांनी शेअर केले की त्याच्या आजोबांनी त्यांना व्हीलचेअरवर अवलंबून न राहण्याचा सल्ला दिला होता आणि सांगितले होते की, असे केल्याने तो आयुष्यभर इतरांवर अवलंबून राहील. बिग बींनी प्रशांत यांच्या या धाडसाचे कौतुक केले. तसंच त्यांना पुढे खेळ खेळण्यात मदतही केली. प्रश्नोत्तरांचा हा खेळ प्रशांत यांनीही अगदी उत्तम खेळत जास्तीत जास्त पैसे जिंकण्याचा प्रयत्न केला.

View this post on Instagram

A post shared by Sony Entertainment Television (@sonytvofficial)

आणखी वाचा – Video : रजनीकांत यांच्या घरामध्ये पुराचं पाणी, चेन्नईमध्ये महागड्या परिसरात राहतात तरीही अशी अवस्था अन्…; व्हिडीओ व्हायरल

गेममध्ये पुढे जाताना, बिग बींनी त्यांना ५० लाख रुपयांचा प्रश्न विचारला. वेलनेस प्रशिक्षक विनय मेनन यांनी विश्वचषक स्पर्धेत बेल्जियमच्या राष्ट्रीय संघासाठी आणि कोणत्या इंग्लिश फुटबॉल क्लबबरोबर काम केले आहे? याचे उत्तर प्रशांतला माहित नसल्याने  त्यांनी हा शो सोडण्याचा निर्णय घेतला. जाण्यापूर्वी त्यांनी पर्याय D निवडला, परंतु त्यांचे हे उत्तर चुकीचे होते. उत्तराचा योग्य पर्याय A हा होता. त्यामुळे प्रशांत यांनी २५ लाख रुपयांची रक्कम बक्षीस म्हणून जिंकली.

आणखी वाचा – “तू असा प्रचार करणं चुकीचं”, लाडकी बहिण जाहिरातीचा व्हिडीओ केल्यानंतर अमृता खानविलकर ट्रोल, म्हणाले, “गैरवापर…”

दरम्यान, या जिंकलेल्या रक्कमेबद्दल प्रशांत यांनी सांगितले की, त्यांची ही पहिली कमाई आहे आणि त्यामुळे त्यांच्यासाठी हे खूप महत्वाचे आहे. शारीरिक आव्हाने असूनही प्रशांत यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. परंतु नोकरी मिळण्यात त्यांना अडचण आली. जिंकलेल्या पैशाचा उपयोग ते त्यांच्या पायावर उपचार करण्यासाठी, वडिलांचे कर्ज फेडण्यासाठी, बहिणीचे लग्न आणि धाकट्या भावाचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी वापरणार आहेत.

Tags: Kaun Banega Crorepati 16Kaun Banega Crorepati 16 Host Amitabh BachchanKaun Banega Crorepati 16 News
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Aai Kuthe Kay Karte serial fame actress Ashwini Mahangde joined Sharad Pawar Nationalist Congress Party see the details

'आई कुठे…' फेम सुप्रसिद्ध अभिनेत्रीची राजकारणात एन्ट्री, शरद पवार गटात केला प्रवेश, म्हणाली, "पक्षाने जबाबदारी दिली तर…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.