शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

लोकप्रिय ‘सीआयडी’ मालिका आता मराठीमध्ये येणार, नवीन प्रोमो समोर, उत्सुकता शिगेला

Saurabh Moreby Saurabh More
ऑक्टोबर 16, 2024 | 10:13 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Sony Channel's CID serial will now be in Marathi new promo shared on social media

सोनी वाहिनीवरील सीआयडी (CID) ही मालिका आता मराठीमध्ये येणार, नवीन प्रोमो समोर

सोनी वाहिनीवरील सीआयडी (CID) ही मालिका सगळ्यांनाच माहित आहे. या मालिकेने प्रेक्षकांना वेड लावलं होतं. १९९८ ते २०१८ पर्यंत म्हणजेच तब्बल २० वर्ष ही मालिका चालली. एसीपी प्रद्युम्न, दया, अभिजीत, फ्रेडी यांच्याबरोबरच इतर सर्वच पात्र गाजली. प्रत्येक एपिसोडमध्ये वेगवेगळ्या केस सोडवताना प्रेक्षकही टीव्हीसमोर बसून असायचे. ‘कुछ तो गडबड है दया’, ‘दया तोड दो दरवाजा’ हे डायलॉगही प्रचंड गाजले. मात्र कालांतराने या लोकप्रिय मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. यामुळे अनेक चाहते नाराज झाले. तसंच अनेकदा ही मालिका नव्याने सुरु व्हावी याबद्दल इच्छाही व्यक्त केल्या गेल्या. (CID Serial In Marathi)

सीआयडी (CID) ही मालिका आता पुन्हा एकदा सुरु होण्याची हीच इच्छा आता पूर्ण होणार आहे, कारण लवकरच सीआयडी (CID) ही मालिका आता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सोनी मराठी वाहिनीवर सीआयडी (CID) ही मालिका सुरु होणार असून नुकताच या मालिकेचा एक नवीन प्रोमो शेअर करण्यात आला आहे. या प्रोमोमध्ये एसीपी प्रद्युम्न, दया व अभिजीत या प्रमुख भूमिकांची झलक पाहायला मिळत आहे. इन्स्पेक्टर दया व इन्स्पेक्टर अभिजीत आणि एसीपी प्रद्युम्न येत आहेत गुन्हेगारांना धडा शिकवायला” असं म्हणत हा प्रोमो शेअर करण्यात आला आहे.

View this post on Instagram

A post shared by Sony मराठी (@sonymarathi)

आणखी वाचा – 16 October Horoscope : मेष, मीन व कन्या राशींच्या लोकांसाठी बुधवारचा दिवस शुभ, इतरांच्या नशिबात काय?, जाणून घ्या..

तसंच “सत्याचा शोध घेण्यासाठी येत आहेत ए.सी.पी. प्रद्युम्न आणि टीम! ‘सीआयडी’ – मराठी, फक्त सोनी मराठी वाहिनीवर, लवकरच” असं या नवीन प्रोमोखाली म्हटलं आहे. त्यामुळे साहजिकच सीआयडी (CID) ही मालिका आता मराठी भाषेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. दरम्यान, इतक्या वर्षांच्या ब्रेकनंतर ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्यामुळे अनेकांनी या नवीन प्रोमोखाली कमेंट्स करत त्यांची उत्सुकता व्यक्त केली आहे. “भारी”, “खूप छान”, “एकच नंबर”, “आतुरता” अशा अनेक कमेंट्स करत या प्रोमोला प्रेक्षकांनी प्रतिसाद दिला आहे.

आणखी वाचा – “तुझं काम आवडलं असं त्यांनी सांगितलं अन्…”, अमृता देशमुखने अतुल परचुरेंबाबत सांगितला ‘तो’ प्रसंग, म्हणाली, “शेवटची आठवण…”

सीआयडी (CID) सोनी टीव्हीवरील सर्वात यशस्वी मालिका आहे. मालिकेने यशस्वीपणे २० वर्षांचा प्रवास पूर्ण केला आहेत. २० वर्षांपासून सुरू असलेल्या या मालिकेचा आजही मोठा चाहता वर्ग आहेत. सीआयडी (CID) हा शो विविध विक्रमांसाठीही ओळखला जातो. ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड’मध्येही या शोची नोंद आहे. अशातच आता हा शो मराठीमध्ये येत असल्यामुळे अनेक चाहते उत्सुक आहेत.

Tags: CID SerialCID Serial In MarathiCID Serial News
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Deepshikha Ngpal ready to marry after divorce
Entertainment

दोन घटस्फोटानंतर अजूनही तीन ते चारवेळा लग्न करण्याची दीपशिखा नागपालची इच्छा, वयाची ४५शी ओलांडून गेली तरी…

जून 7, 2025 | 1:26 pm
Next Post
Paaru Marathi Serial Update

Paaru Marathi Serial : किर्लोस्करांच्या घरी प्रियाचा रीतसर गृहप्रवेश होणार का?, दामिनीने मध्येच अडवलं अन्…; अहिल्यादेवी काय उत्तर देणार?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.