वडील म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातील एक महत्वाची बाजू. आपल्या आयुष्याला शिस्त देण्याचं काम केलं जात ते वडिलांकडून. आज महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम अभिनेत्री नम्रता संभेरावच्या वडिलांचा वाढदिवस त्या निम्मित नम्रता ने एक खास पोस्ट लिहून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.(Namrata Sambherao Father)
वडिलांसोबतचा एक फोटो पोस्ट करत नम्रता ने लिहिलंय ” Happy birthday pappa❤️ तेरी लाडकी मै ♥️ मला माहितीय आमच्या 3भावंडांपैकी मी लाडकी आहे माझ्या पप्पांची अस्तित्व नावाची माझी पहिली एकांकिका. वांगणी ला झाली होती ती स्पर्धा. 16वर्षांची होते, जाताना नाटकाच्या ग्रुप बरोबर गेले, पण येताना लेक रात्री एकटी कशी येणार ह्या काळजीमुळे माझे वडील मला न्यायला आले. आणि आलोच आहे तर काय करतेय लेक, कसं करते हे सुद्धा पाहिलं त्यांनी.

आणि तो दिवस मी कधीच विसरू शकत नाही, त्यांनी एकांकिका पाहिली, कौतुक झालेल पाहिलं , मला अभिनयासाठी प्रथम पारितोषिक मिळालं तेव्हा तेही पाहिलं. आणि सगळ्यात मोठं बक्षीस मिळालं मला त्यादिवशी पप्पांकडून, ते म्हणजे त्यांच्या डोळ्यातलं पाणी, माझ्याबद्दलचा अभिमान, आणि अभिनयाच्या क्षेत्रात काम करण्याची परवानगी.
अजून काय हवंय. मला आठवतंय जेवढं त्याप्रमाणे “बाहुलीच हवी मला द्या मज आणुनी” ह्या हट्टानंतर जर कुठला माझा हट्ट असेल तर तो म्हणजे “अभिनयच माझी कला घ्या तुम्ही जाणुनी” कारण पप्पाना मान्य नव्हतं हे क्षेत्र पण त्यामागे त्यांची माझ्याबद्दल वाटणारी काळजी होती कोणीच नव्हतं ह्या क्षेत्रात माहितीतलं पण फक्त विश्वासाच्या जोरावर त्यांनी मला पाठिंबा दिला ♥️ नंतर जेव्हा आम्ही कधी बाहेर पडायचो अगदी कुठेही डॉक्टर कडे वगरे कि त्यांना सांगायचे माझी सगळी history , कुठली serial कुठलं award , सगळं जे मला आठवत नसे तेही सगळं सांगायचे पण त्यांच्या डोळ्यातला आनंद त्यांचा उत्साह बघून मन भरून यायचं♥️माझे पप्पा जगात भारी आहेत माझं अतोनात प्रेम आहे त्यांच्यावर
l love u pappa❤️(Namrata Sambherao Father)
नम्रताने लिहिलेल्या या पोस्ट वर अभिनेता प्रसाद खांडेकर, समीर खांडेकर आणि चाहत्यांनी ही कमेंट करत नम्रताच्या वडिलांना शुभेच्छा दिल्या आहेत.