सध्या रंगभूमीकडे प्रेक्षक पुन्हा एकदा वळताना दिसत आहेत आणि या मध्ये अनेक नाटकांचा कलाकारांचा वाटा आहे. रंगभूमी समृद्धी करण्यामध्ये मोलाचं योगदान आहे अभिनेते प्रशांत दामले आणि आता त्यांच्याच पाऊलावर पाऊल ठेवणाऱ्या संकर्षण कऱ्हाडेंचं उत्कृष्ट नाटकांचं लेखन आणि सादरीकरण संकर्षण कऱ्हाडे आणि त्याच्या नाटकातील सगळ्या सदस्यांकडून केलं जात आहे.(Sankarshan Karahade Bus Drive)
रंगभूमीवर संकर्षणच नियम व अटी लागू आणि तू म्हणशील तसं या दोन नाटकांचे हाउसफुल्ल प्रयोग सुरु आहेत. पण या व्यतिरिक्त संकर्षण कऱ्हाडे आता चर्चेत आहे ते त्याच्या धाडसी कृत्यासाठी. एका प्रयोग नंतर परतताना बस ड्रायव्हर आजारी पडला मग काय संकर्षण ने नाटकासारखीच बस चालवण्याची ही जबाबदारी घेतली आणि बसच सारथ्य केलं.

त्या संदर्भात प्रश्न दामले यांनी एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. आणि त्या व्हिडिओ च्या कॅप्शन मध्ये त्यांनी लिहिलंय “काल रात्री कोथरूडच्या प्रयोगाला आमचा चालक प्रवीण ह्याला बर वाटेनास झाल. साधारणपणे प्रयोग 12.30 ला संपल्यावर आम्ही सेट भरून जेवून पहाटे 2 च्या सुमारास मुंबईकडे निघतो. पण चालक आजारी पडला म्हटल्यावर सगळच थांबल. पण थांबेल तो संक्या कसला.
त्याने चालकाला मागे झोपवल आणि स्वतः ड्राइवर सीटवर बसला आणि लोणावळ्यापर्यंत बस हाणली. त्याच्याकडे हेवीचा पण लायसन आहे हे कालच मला कळले. लोणावळ्याला ड्राइवर ओके आणि मग संक्या मागे जाऊन झोपला. इसको बोलता हैं जिगर ???????????????????????????????? नाटकाचे प्रयोग आणि बस एकाच स्पीड ने चालु आहेत.(Sankarshan Karahade Bus Drive)
हे देखील वाचा – ‘मला लग्न झालेली बाई माझ्या चित्रपटात नको आहे’ कोठारेंनी झपाटलेला मध्ये निवेदिता यांना नाकारला रोल