Suraj Chavan Bigg Boss Marathi Season 5 Winner: ‘बिग बॉस मराठी’चा महाअंतिम सोहळा नुकताच पार पडला. या पर्वात सूरज चव्हाणने बाजी मारत पाचव्या पर्वाच्या झगमगत्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं. सध्या सर्व स्तरांतून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या ट्रॉफीवर सूरज चव्हाणने नाव कोरत प्रेक्षकांच्या मनात घर केलं. यंदाची ही ट्रॉफी बारामतीत गेली असल्याने साऱ्या महाराष्ट्राला खूप आनंद झाला असल्याचे पाहायला मिळतेय. सूरज ‘बिग बॉस’च्या घरात असताना त्याला प्रेक्षकांकडून भरभरुन पाठिंबा मिळताना पाहायला मिळाला. सोशल मीडियावर ही सूरज चव्हाणचं विजेता व्हायला हवा असा नारा प्रेक्षकांनी लगावलेला दिसला आणि त्याप्रमाणे सर्वाधिक वोट मिळवत सूरज चव्हाण विजेता ठरला.
सूरज चव्हाण विजेता झाल्यानंतर त्याला यंदाची ‘बिग बॉस’च्या ट्रॉफी तर मिळालीच याशिवाय १४ लाख ६० हजार रुपये इतकी रक्कमही त्याने पटकावली. तर पु.ना. गाडगीळ यांच्याकडून १० लाखांचा चेक मिळाला. इतकंच नव्हे तर त्याला एक सुंदर अशी पु. ना. गाडगीळ ज्वेलर्स यांच्याकडून डायमंड ज्वेलरी देखील मिळाली. तसेच त्याला विजेता होताच इलेक्ट्रिक स्कूटरही भेट म्हणून मिळाली. अशा अनेक बक्षीसांचा वर्षाव सूरजवर झालेला पाहायला मिळाला.
आणखी वाचा – बारामतीमधील गावात सूरज चव्हाण असं जगतो आयुष्य, मजुरी करुन भरलं पोट, फक्त आठवी पर्यंत शिक्षण अन्…
विजेतेपद पटकावल्यानंतर आता सूरज चव्हाण मिळालेल्या या भरघोस रकमेचं काय करणार हा प्रश्न साऱ्यांना पडला आहे. याचं उत्तरही सूरजने दिलेलं पाहायला मिळत आहे. “मला माझं घर ‘बिग बॉस’च्या घरासारखं बांधायचं आहे. मला मिळालेली लक्ष्मी मी माझ्या घरासाठी वापरणार”, असं मत त्याने रक्कम जिंकल्यावर केलं. सूरज हा हलाखीच्या दिवसातून वर आला आहे. गरीबी व हलाखीच्या परिस्थितीमुळे सूरजने त्याचं शालेय शिक्षणही पूर्ण केलं नाही. त्याने फक्त आठवीपर्यंतचे शिक्षण घेतले.
आणखी वाचा – “ट्रॉफी त्यांची पण धमाका माझा”, निक्की तांबोळीचा टोमणा नक्की कोणाला?, म्हणाली, “सांगा नक्की कोण जिंकलं?”
शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याने मोलमजुरी करत घराची परिस्थिती सांभाळली. आई-वडील गेल्यानंतर त्याच्या बहिणीने त्याचा सांभाळ केला. सूरजला स्वतःच घर बांधायची इच्छा आहे, याबाबत त्याने अनेकदा ‘बिग बॉस’च्या घरात बोलून दाखवलं. आता सूरजची ही इच्छा लवकरच पूर्ण होणार असल्याचं समोर आलं आहे. ‘बिग बॉस’चे विजेतेपद पटकावल्यानंतर सूरज मिळालेल्या रकमेतून त्याचं स्वतःच हक्काचं घर बांधणार आहे.