‘ओटीटी’ (ओव्हर द टॉप) प्लॅटफॉर्म्स आणि बॉलिवूडमधील बदलत्या ट्रेंड्सचा आढावा घेतल्यास, ऑक्टोबर महिना हा सिनेसृष्टीसाठी निर्णायक टप्पा ठरू शकतो. थालापती विजयच्या ‘गोट’पासून, काजोलच्या ‘दो पत्ती’पर्यंत अनेक चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होत आहेत. ‘गोट’, ‘सीटीआरएल’, ‘दो पत्ती’, ‘द सिग्नेचर’ यांसारखे चित्रपट व सीरज यंदाच्या आठवड्यात ओटीटीवर धडकले आहेत. ओटीटी आणि चित्रपटगृह यांच्यातील बदलत्या समीकरणांच्या पार्श्वभूमीवर, प्रेक्षकांना घरबसल्या दर्जेदार मनोरंजनाची मेजवानी अनुभवता येणार आहे आणि साहजिकच प्रेक्षकांसाठी ही सुखावणारी बाब आहे. त्यामुळे आगामी ऑक्टोबर महिना ओटीटी प्रेमींसाठी मनोरंजक असणार आहे. चला जाणून घेऊ या महिन्यात प्रदर्शित होणारे चित्रपट व सीरिज कोणते आहेत.
गोट : हा सिनेमा आधीच बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करून गेला आहे. आता तो ओटीटीवर प्रदर्शित झाला आहे. अॅक्शन आणि थरार असं मिश्रण असलेला हा चित्रपट विजयच्या चाहत्यांसाठी पर्वणी आहे. ३ ऑक्टोबर रोजी हा चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी माध्यमावर प्रदर्शित झाला आहे.
द ट्राइब : करण जोहर निर्मित ‘द ट्राइब’मध्ये इन्फ्लुएन्सर्सची गोष्ट दाखवण्यात येणार आहे. काही एन्फ्लुएन्सर्स लॉस एंजेलिसमध्ये जातात आणि तिथे वेगवेगळ्या प्रकारच्या कंटेंटचे शूटिंग कसे करतात हे या चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. ४ ऑक्टोबरपासून प्राइम व्हिडीओवर हा चित्रपट पाहू शकतो.
दो पत्ती : काजोल आणि क्रिती सेनन यांची प्रमुख भूमिका असलेला ‘दो पत्ती’ हा चित्रपट लवकरच ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात काजोल पहिल्यांदाच पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारत आहे. हा मिस्ट्री थ्रिलर २५ ऑक्टोबरला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.
आणखी वाचा – Bigg Boss Marathi चा विजेता अभिजीत सावंतच असणार?, बॉलिवूडकरांचा मोठा पाठिंबा, म्हणाले, “तोच जिंकावा आणि…”
स्त्री २ : राजकुमार राव आणि श्रद्धा कपूर यांची मुख्य भूमिका असलेला चित्रपट ‘स्त्री २’ १५ ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला चाहत्यांकडून आणि समीक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. येत्या ११ ऑक्टोबरपासून प्राइम व्हिडीओवर हा चित्रपट पाहता येणार आहे.