अनेक कलाकार विविध माध्यमांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. अनेक काम करून ही एखाद्या विशिष्ठ भूमिकेसाठी तो कलाकार ओळखला जातो. जस कि अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड. चित्रपट, नाटक, मालिका अनेक माध्यमांमध्ये काम करणारी अभिनेत्री प्राजक्ता ओळखली जाते खास करून महाराणी येसूबाई यांच्या भूमिकेसाठी.(Prajakta Gaikwad South Movie)
झी मराठीवरील स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेत प्राजक्ताने महाराणी येसूबाई यांची भूमिका साकारली होती. या मालिकेत प्राजक्ता सोबत अभिनेते अमोल कोल्हे यांनी छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली होती. यांनी साकारलेल्या या भूमिका पुढे अमोल कोल्हे यांच्या शिवपुत्र संभाजी या महानाट्यामध्ये देखील पाहायला मिळाली. पण काही दिवसांपूर्वी प्राजक्ताने हे महानाट्य सोडलं आणि येसूबाईंची भूमिका अभिनेत्री स्नेहलता वसईकरला देण्यात आली. पण प्राजक्ताने हे भूमिका का सोडली यांचं कारण मात्र गुलदस्त्यात होतं.
प्राजक्ताकच्या नवीन चित्रपटाबाबत जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा(Prajakta Gaikwad South Movie)
https://www.instagram.com/reel/Cs1KoWXuAHc/?utm_source=ig_web_copy_link&igshid=MzRlODBiNWFlZA==
प्राजक्ताने हे महानाट्य सोडण्याचं कारण आता पुढे आलं आहे. प्राजक्ता सध्या हैद्राबाद येथे एका दाक्षिण्यात चित्रपटाच्या शूटिंग मध्ये व्यस्त असून त्यामुळेच तिने महानाट्य सोडलं अशी चर्चा सर्वत्र रंगली आहे.

नाशिक, कोल्हापूर, संभाजीनगर, पुणे या शहरांमध्ये या महानाट्याचे अनेक प्रयोग झाले असून प्रेक्षकांनी देखील या महानाट्याला भरभरून प्रतिसाद दिला. तर प्राजक्ता गायकवाडला सुद्धा महाराणी येसूबाई यांच्या भूमिकेने वेगेळी ओळख निर्माण करून दिली. याशिवाय प्राजक्ताने लॉकडाऊन लग्न, सिंगल, चेकमेट द गेम नेव्हर एन्ड या चित्रपटांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे तर स्वराज्य रक्षक संभाजी आणि आई माझी काळूबाई या मालिकांमध्ये देखील तिने महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.