रविवार, जून 8, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : देशमुखांच्या घरी अशी केली जाते नवरात्रीमध्ये पूजा, देवघर आहे इतकं मोठं, जिनिलीयाने शेअर केला Inside Video

Saurabh Moreby Saurabh More
ऑक्टोबर 5, 2024 | 12:24 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Genelia Deshmukh Navratri Puja Video

मराठी अभिनेत्री जिनिलीया देशमुखने इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे घरच्या नवरात्री पूजेची खास झलक दाखवली आहे.

नुकतीच शारदीय नवरात्री उत्सवाला सुरुवात झाली आहे. यानिमित्ताने सर्वत्र आनंदाचे व चैतन्याचे वातावरण पाहायला मिळत आहे. घराघरांत-मंडपांमध्ये देवीचे थाटामाटात आगमन झाले आहे. राज्यातही नवरात्रौत्सवाची धूम पाहायला मिळत आहे. सामान्य प्रेक्षकांसह सिनेसृष्टीतील कलाकार मंडळींच्या घरीदेखील या नवरात्रीची धामधूम पाहायला मिळत आहे. अनेकांच्या घरी नवरात्रीनिमित्ताने घटस्थापना करण्यात आली आहे आणि यामध्ये कलाकारांचाही समावेश आहे. या कलाकारांपैकी एक कलाकार म्हणजे जिनिलीया देशमुख. जिनिलीया मूळची महाराष्ट्रातली नसली तरीही मराठी सण, उत्सव, परंपरा ती मोठ्या आनंदाने साजरे करत असते. त्यामुळे देशमुखांच्या सुनबाईंचं सोशल मीडियावर नेहमीच कौतुक करण्यात येतं. (Genelia Deshmukh Navratri Puja Video)

स्वर्गीय विलासराव देशमुखांच्या घरी प्रत्येक मराठी सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो आणि यात जिनिलीया अगदी आनंदाने सहभाग घेते. याआधी जिनिलीयाने आषाढी एकादशी असो… गणपती असो… हे मराठी सण आनंदात व उत्साहात साजरे केल्याचे पाहायला मिळाले आहे. अशातच देशमुखांच्या घरी यंदाची शारदीय नवरात्रदेखील मोठ्या दिमाखात पार पडत असून देशमुखांच्या घरी यानिमित्ताने पूजा केली जात आहे. घरी घटस्थापना केली गेली आहे आणि यांची खास झलक जिनिलीयाने आपल्या सोशल मीडियावर शेअर केली आहे.

View this post on Instagram

A post shared by Marathi Celeb's Katta (@marathicelebkatta)

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : “उद्याही तूच विजेता राहशील”, सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याचा सूरजला फुल्ल सपोर्ट, म्हणाला, “माझ्या प्रार्थना…”

जिनिलीयाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये रितेश देशमुखची आई व जिनिलीयाची सासू म्हणजेच वैशाली देशमुख या पूजा करताना पाहायला मिळत आहे. या व्हिडीओमध्ये देशमुखांच्या देवघराचीदेखील संपूर्ण झलक पाहायला मिळत आहे. हे देवघर अगदी भव्य दिव्य असं असून घरात अनेक देवदेवतांच्या प्रतिमा पाहायला मिळत आहेत. गणपती बाप्पा, देवी लक्ष्मी आणि श्री स्वामी समर्थ तसंच अनेक हिंदू देवी-देवतांच्या प्रतिमा असल्याचेही पाहायला मिळत आहे. ‘आईबरोबर घटस्थापना’ असं म्हणत जिनिलीयाने हा सुंदर व्हिडीओ शेअर केला आहे.

आणखी वाचा – नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी मकर व मीन राशीच्या लोकांना व्यवसायात फायदा, इतरांच्या नशिबात काय, जाणून घ्या…

दरम्यान, महाराष्ट्राची वहिनी म्हणून जिनिलीया देशमुख ओळखली जाते. जिनिलीया हा जन्माने ख्रिश्चन असली तरी ती आपलं मराठीपण कायम जपत आली आहे आणि तिच्या याच कृतीचे कौतुक होतं. जिनिलीयाने याआधी वटपौर्णिमा, आषाढी एकदाशी, गणपती, दिवाळी असे सगळे सण मोठ्या हौशीने साजरे केले असून याचे खास क्षण ती सोशल मीडियावर शेअर करत असते. अशातच नवरात्रीच्या सणाचे खास क्षणही तिने शेअर केले आहेत.

Tags: Genelia Deshmukh Navratri Puja VideoNavratri 2024Sharadiya NavratriSharadiya Navratri 2024
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
katrina kaif viral video

कतरिना कैफच्या हाताला मोठा काळा पॅच, डायबिटीज असल्याचे तर्कवितर्क, चाहत्यांनी तब्येतीची विचारपूस केली अन्…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.