चित्रपट प्रेक्षकांना पर्यंत पोहचावा या साठी आवश्यक असत ते म्हणजे प्रमोशन. चित्रपटाच्या प्रचारासाठी चित्रपटाला अनुसरून अनेक वेगवेगळे उपक्रम चित्रपटाच्या कलाकारांकडून केले जातात. याचंच एक उदाहरण पाहायचं असेल तर क्रिती सॅनॉनलाच पाहा. सध्या क्रितीच्या आदिपुरुष चित्रपटाची सर्वत्र चर्चा आहे. चित्रपटातील गाण्यांणी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. सोबतच सुरुवातीला चित्रपटाच्या निर्मात्यांना अनेक टीका ,आरोपांना समोर जावं लागेलेलं. (Kriti Sanon Nashik Tour)

सध्या सगळीकडे चित्रपटाचं जोरदार प्रमोशन सुरु आहे येत्या १६ जूनला हा चित्रपट प्रेक्षशकांच्या भेटीला आहे. त्यामुळे चित्रपटातील कलाकार सध्या सर्वत्र प्रमोशन करताना दिसतायत. त्या निमित्त अभिनेत्री क्रिती ने देखील नाशिकच्या प्रसिद्ध काळाराम मंदिर आणि सीता गुफा इथे भेट दिली आहे. तिचे नाशिक मध्ये दर्शन घेतानाचे फोटो देखील वायरल होताना दिसतायत.
खाली दिलेल्या लिंक वर पाहा क्रितीचा पूजा करतानाच व्हिडिओ(Kriti Sanon Nashik Tour)
https://www.instagram.com/p/Cs1ia4ftlBz/?utm_source=ig_web_copy_link&igshid=MzRlODBiNWFlZA==
या चित्रपटात कृती सोबत दाक्षिण्यात अभिनेता प्रभास देखील पाहायला मिळणार आहे. याचबरोबर मराठमोळा अभिनेता देव दत्त नागे देखील या चित्रपटात मारूतिरायांची भूमिका साकारताना दिसणार आहे. आधिपुरुष या चित्रपटाचे दिगदर्शन मराठमोळा दिगदर्शक ओम राऊत ने केले असून मराठी चित्रपट क्षेत्रातील अनेक कलाकारांनी ओम ला या साठी शुभेच्छा देखील दिल्या आहेत.
