यंदाच्या आयपीएलच्या सीझनमध्ये तिने चेन्नई सुपरकिंगने बाजी मारली. सर्वत्र चेन्नई सुपर किंग्सच नाव घेतलं जातंय, सोशल मीडियावरही त्यांच्या विजयाचीच चर्चा रंगलेली दिसतेय. चेन्नईचा स्टार फलंदाज रविंद्र जडेजाने चौकार आणि षटकार ठोकल्याने यंदाचा आयपीएल २०२३ चा किताब चेन्नई सुपर किंग्स ही टीम जिंकण्यात यशस्वी ठरली आहे.
रविंद्र जडेजाच्या धडाकेबाज फलंदाजीचं सर्वत्र कौतुक होतच आहे. तर दुसरीकडे चेन्नई सुपर किंग्सचा फलंदाज ऋतुराज गायकवाडच्या पोस्टने धुमाकूळ घातलाय. त्याने त्याच्या होणाऱ्या पत्नीबरोबरचा खास फोटो इंस्टाग्राम अकाऊंटवरून पोस्ट केला आहे. आणि ऋतुराजच्या या पोस्टवरील अभिनेत्री सायली संजीवच्या कमेंटने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.(Sayali sanjeev Ruturaj Gaikwad)

पाहा सायलीने ऋतुराजच्या पोस्टवर काय कमेंट केलीय (Sayali sanjeev Ruturaj Gaikwad)
चेन्नई सुपर किंग्सचा फलंदाज ऋतुराज गायकवाड याने चेन्नई सुपर किंग्जच्या विजयानंतर इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्याच्या या पोस्टमध्ये भारताचा माजी कर्णधार, चेन्नई सुपर किंग्जचा विद्यमान कर्णधार असलेल्या महेंद्रसिंग धोनी आहे, त्याच्या एका बाजूला ऋतुराज आणि एका बाजूला ऋतुराजची होणारी पत्नी उत्कर्षा बसली आहे.(Sayali sanjeev Ruturaj Gaikwad)
ऋतुराजने महेंद्र सिंग धोनी आणि उत्कर्षाच्या फोटोसोबत “माझ्या आयुष्यातील दोन व्हीव्हीआयपी. यासाठी मी देवाचा खरंच आभारी आहे”, असे कॅप्शन ऋतुराजने या फोटोला दिले आहे. ऋतुराजची ही पोस्ट सध्या चांगलीच व्हायरल होत आहे. त्याच्या या पोस्टवर मराठमोळी अभिनेत्री सायली संजीवने कमेंट केली आहे.
हे देखील वाचा – सुंदरा मनामध्ये भरली मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप?
“तुम्हा दोघांना मनापासून शुभेच्छा”, अशी कमेंट सायली संजीवने केली आहे. तिने उत्कर्षा आणि ऋतुराज या दोघांनाही कमेंटमध्ये टॅग केले आहे. सायली आणि ऋतुराज यांच्यात अफेअर असल्याच्या चर्चाना उधाण आलं होत मात्र आता ऋतुराजने पोस्ट केलेल्या फोटोवरून आणि सायलीने त्याच्या फोटोवर केलेल्या कमेंटवरून या साऱ्या चर्चाना पूर्णविराम मिळाला आहे.(Sayali sanjeev Ruturaj Gaikwad)
ऋतुराजने पहिल्यांदाच उत्कर्षाबरोबर जाहीरपणे फोटो पोस्ट केला आहे. ते दोघेही जूनच्या पहिल्या आठवड्यात लग्नबंधनात अडकणार असल्याचे बोललं जात आहे. मात्र अद्याप याबद्दल ऋतुराजने अधिकृत माहिती दिलेली नाही.
