रविवार, जून 8, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“घराबाहेर येताच मी तिला भेटणार आणि….”, पॅडींच्या अपमानावरुन विशाखा सुभेदार जान्हवीला खडसावणार, म्हणाल्या, “तिचं खोटं नाटक…”

Saurabh Moreby Saurabh More
ऑक्टोबर 4, 2024 | 11:59 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Vishakha Subhedar On Paddy Kamble Insult by Janhvi Killekar

जान्हवी किल्लेकरने पॅडी कांबळे यांच्याबद्दल केलेल्या अपमानास्पद केलेल्या वक्तव्यावर विशाखा सुभेदार यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे

‘बिग बॉस मराठी’चे पाचवे पर्व आता संपायला आले आहे. अवघ्या दोन दिवसांवर या पर्वाचा महाअंतिम सोहळा आला आहे. ‘बिग बॉस मराठी’चे यंदाचे पर्व अनेक कारणांनी गाजले. त्यापैकी एक कारण म्हणजे जान्हवीने पॅडी कांबळेंचा केलेला अपमान.  ‘सत्याचा पंचनामा’ या टास्कदरम्यान जान्हवी पॅडी यांना असे म्हणालेली की, “आयुष्यभर ओव्हर अ‍ॅक्टिंग केली आणि आता इथे येऊन ओव्हर अ‍ॅक्टिंग करत आहेत”. त्यानंतर लगेच तिने पॅडी यांची माफी मागितली, मात्र यामुळे तिला प्रेक्षकांच्या प्रचंड मोठ्या रोषाला सामोरे जावे लागले होते. तिने केलेल्या वक्तव्याबद्दल अनेकांनी निषेध व्यक्त केला होता. यावेळी पॅडी यांची मैत्रीण व सहकलाकार विशाखा सुभेदार यांनीही भली मोठी पोस्ट शेअर करत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली होती. अशातच आता पुन्हा एकदा विशाखा यांनी जान्हवीने केलेल्या वक्तव्याबद्दल आपली तोफ डागली आहे. (Vishakha Subhedar On Paddy Kamble Insult)

गेल्या आठवड्यात पॅडी कांबळेंचा ‘बिग बॉस मराठी’मधील प्रवास संपला. त्यानंतर पॅडी व विशाखा यांनी ‘इट्स मज्जा’शी खास संवाद साधला. या संवादात विशाखा यांनी जान्हवीने पॅडी यांना ‘जोकर’ व ‘ओव्हर अ‍ॅक्टर’ बोलल्यावरुन तिचा समाचार घेतला. विशाखा यांनी जान्हवीने केलेल्या वक्तव्याबद्दल असं म्हटलं की, “जोकर आणि ओव्हर अ‍ॅक्टर बोलण्याचा जो मुद्दा झाला होता तिथे माझी तार सटकली होती. म्हणजे तू एक कलाकार आहेस आणि कलाकार म्हणून तू दुसऱ्या कलाकाराला असं अपमानित करुच शकत नाही. राष्ट्रीय टेलिव्हिजनवर तुम्ही असं अपमान नाहीच करायचा. वर्षाताईंना ती बोलली तेव्हाही मला राग आला होता. पण मला कळत नव्हतं. हा गेम आहे की काय? असं वाटलं. पण ती जेव्हा पॅडीबद्दल बोलली तेव्हा मी तो भाग संपूर्ण पाहिला आणि मी चिडले. तेव्हा रात्री दोन वाजता पॅडीबद्दलची ती पोस्ट लिहिली की तू असं वागणं चुकीचे आहे वगैरे वगैरे”.

View this post on Instagram

A post shared by Majja (@its.majja)

आणखी वाचा – Bigg Boss Marathi मधून आणखी एक जण घेणार निरोप, कोण असेल हा सदस्य? ‘या’ स्पर्धकाच्या नावाची चर्चा

यापुढे विशाखा यांनी असं म्हटलं की, “तेव्हा वाटलं नव्हतं की, माझी ती पोस्ट व्हायरल होईल आणि त्याला इतका पाठींबा मिळेल असं… मी माझ्या सोशल मीडियावर मला जे वाटेल ते शेअर करत असते. त्याचे काय पडसाद उमटतील याचा विचार मी नाही करत. पण ती जोकर बोलली तेव्हा मी म्हटलं तुझा जन्म साधारण १९९८ चा वगैरे असेल आणि तेव्हा पॅडीने त्याच्या करिअरला सुरुवात करुन २००८ मध्ये तो प्रसिद्धीच्या शिखरावर होता. तेव्हा तू पाळण्यात असशील आणि जेमतेम मऊ भात खात असशील. तर तू असं जोकर किंवा ओव्हर अ‍ॅक्टर नाही म्हणू शकत. एका कलाकाराने दुसऱ्या कलाकाराचा असा अपमान करणे यासारखं पाप नाही. तू फक्त त्याचा नाही तर त्याला मदत करणाऱ्या, त्याला काम देणाऱ्या आणि त्याच्यावर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाचा अपमान केला आहे. त्यामुळे माझा पण अपमान झाला असं मला वाटलं.

आणखी वाचा – लाभले आम्हांस भाग्य…; मराठी भाषेला ‘अभिजात’ दर्जा मिळताच कलाकारांनी व्यक्त केला आनंद, पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मानले आभार

यापुढे त्या असं म्हणाल्या की, “ती पॅडीला जेव्हा सॉरी बोलली तेव्हा मला ते अजिबातचं पटलं नव्हतं. दु:खी व कष्टी होऊन ती सॉरी बोलली मला ते खोटं आणि नाटक वाटलं होतं. त्यामुळे ती बरी पण अभिनेत्री नसावी. ती बाहेर आल्यावर मी भेटणार आणि तिला बोलणार आहे. रागाच्या भरात आपण टीव्हीवर काय बोलतो याचं भान ठेवलं पाहिजे. त्यामुळे ती रडून सॉरी बोलली असली तरी मला तो गेम वाटला. मला वाटलं नाही ती मनापासून सॉरी बोलली की काय… तर ती बाहेर येऊन मी तिला त्याची जाणीव करुन देणार आहे”.        

Tags: Janhvi Killekar Paddy Kamble InsultJanhvi Killekar Paddy Kamble Insult NewsVishakha Subhedar On Paddy Kamble Insult
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Bigg Boss Marathi Season 5 grand finale announcment

Bigg Boss Marathi : ग्रँड फिनालेसाठी रितेश देशमुख पुन्हा येणार, रंगणार भाऊचा धक्का, म्हणाला, "सदस्यांना मोठा धक्का मिळणार आणि…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.