Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’चा पाचवा सीझनची सध्या जोरदार चर्चा सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. या घरातील एकूण १६ जणांच्या प्रवासाने सुरुवात झाली होती आणि आता प्रवास अवघ्या ६ जणांपर्यंत येऊन पोहोचला आहे. गुरुवारी पार पडलेल्या मिड वीक एलिमिनेशनमध्ये सिनेविश्वातील दिग्गज अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांचा प्रवास संपला. तब्बल ६७ दिवसांनी वर्षा यांनी घराचा निरोप घेतला. ‘बीबी हाऊस पार्टी’ सुरु असताना ‘बिग बॉस’ने सर्वांना मोठा धक्का दिला. मिडवीक एलिमिनेशन जाहीर करून ‘बिग बॉस’ने पाचव्या पर्वातील टॉप ६ स्पर्धकांच्या नावांची घोषणा केली आणि वर्षा उसगांवकर यांचा ‘बिग बॉस’च्या घरातील प्रवास संपला. (Bigg Boss Marathi 5 New Promo)
वर्षा उसगांवकर यांनी शोचा निरोप घेतल्यानंतर ‘बिग बॉस मराठी ५’ शोला टॉप ६ स्पर्धत मिळाले आहेत. अभिजीत, अंकिता, सूरज, निक्की, धनंजय आणि जान्हवी… अशातच आता या सहा जणांपैकी आणखी एकाचा प्रवास संपणार आहे. ‘बिग बॉस’च्या शेवटच्या स्पर्धेत एकूण पाच जणांचा समावेश होतो. त्या निकषांनुसार या घरातील आणखी एक जण निरोप घेणार आहे आणि याचा एक प्रोमो नुकताच शेअर करण्यात आला आहे.
आणखी वाचा – मोठा धक्का! Bigg Boss Marathi मधून वर्षा उसगांवकर घराबाहेर, सदस्यांनाही झटका, नक्की कुठे चुकलं?
कलर्स मराठीकडून सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या या नवीन प्रोमोमध्ये ‘बिग बॉस’ असं म्हणतात की, “‘बिग बॉस मराठी’च्या या सीझनचे टॉप ६ मी जाहीर केले आहेत. पण इथेच येतो आहे एक ट्विस्ट. त्यामुळे आता आपल्याला कळेल कोण आहेत टॉप ५”. ‘बिग बॉस’च्या या उद्घोषणेमुळे जाहीर आहे की एक जण या घरातून निरोप घेणार आहे. त्यामुळे आता जान्हवी, निक्की, अभिजीत सूरज अंकिता आणि धनंजय यांपैकी कुणाचा प्रवास संपणार यासाठी उत्सुकता लागून राहिली आहे.
दरम्यान, जुलै महिन्यात ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाला अगदी दणक्यात सुरुवात झाली होती. टीआरपीमध्येही हा कार्यक्रम अव्वल ठरला होता. तर नॉन-फिक्शन कार्यक्रमांमध्ये सर्वाधिक पाहिला जाणारा शो म्हणून या कार्यक्रमाकडे पाहिले गेले. अशातच आता हा शो प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. १०० दिवसांऐवजी ७० दिवसांत हा शो संपणार आहे. येत्या ०६ ऑक्टोबर रोजी या शोचा महाअंतिम सोहळा पार पडणार आहे.