Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस मराठी’चं पाचवं पर्व लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या पर्वाचा शेवटचा आठवडा सुरु असून आता ‘बिग बॉस मराठी’चा विजेता घोषित करण्यात येणार आहे. या पर्वाच्या ट्रॉफीवर कोणता स्पर्धक नाव कोरणार हे पाहणं उत्सुकतेचं आहे. मात्र ‘बिग बॉस मराठी’च्या मिड वीक एलिमिनेशनने साऱ्यांच्या नजरा ताणून धरल्या आहेत. अशातच आज ‘बिग बॉस’च्या घरात मिड वीक एलिमिनेशन झालं. यामध्ये एका स्पर्धकाचा ‘बिग बॉस’च्या घरातील प्रवास संपला आहे. हा स्पर्धक म्हणजे कोकणहार्टेड गर्ल अंकिता वालावलकर. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अंकिता वालावलकरने ‘बिग बॉस’च्या घरातून एक्झिट घेतली आहे.
‘बिग बॉस मराठी’च्या घरात शेवटच्या आठवड्यात निक्की तांबोळी, अभिजीत सावंत, धनंजय पोवार, अंकिता वालावलकर, जान्हवी किल्लेकर, सूरज चव्हाण, वर्षा उसगांवकर हे स्पर्धक शिल्लक होते. या स्पर्धकांपैकी तिकीट टू फिनाले मध्ये बाजी मारत निक्की तांबोळी ही ‘बिग बॉस’ सीझन ५ ची पहिली ग्रँड फायनलिस्ट ठरली आहे. त्यामुळे उर्वरित सहा स्पर्धक आता नॉमिनेट झाले असताना यांत मिड वीक एलिमिनेशन आल्याने स्पर्धकांना धक्का बसला. या मिड वीक एलिमिनेशनमध्ये कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकर हिने एक्झिट घेतली आहे.
अगदी पहिल्या दिवसापासून अंकिता वालावलकर हिने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. कोकणी भाषेवर प्रभुत्त्व असणाऱ्या अंकिताने तिच्या खेळीने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. टीम बी मधील प्रत्येक स्पर्धकाशी अगदी पाहिल्यादिवसापासून ती लॉयल राहिली. शिवाय टीम बी मधून ती उत्तम खेळ खेळताना दिसली. प्रत्येक टास्कमध्ये अंकिता अगदी मेहनतीने खेळताना दिसली. घरातील अंकिताचा वावरही वाखाणण्याजोगा होता.
यंदाच्या ‘बिग बॉस’मध्ये रील स्टारल खूप मोठा प्लॅटफॉर्म मिळवून दिला आहे. यंदा सुप्रसिद्ध रील स्टार कोकण हार्टेड गर्लची एण्ट्री पाहायला मिळत आहे. अंकिता वालावलकर ही कंटेंट क्रियेटर बिझनेस वुमन तसेच Vlogger आहे. अंकिताच्या Kokanheartedgirl या इंस्टाग्राम अकाउंटवर पाच लाखांहून अधिक फॉलोवर्स आहेत.