बॉलिवूड अभिनेता आमिर खानशी संबंधित एक दु:खद बातमी समोर येत आहे, ती म्हणजे आमिर खानची पहिली पत्नी रीना दत्ताच्या वडिलांचं निधन झालं आहे. आज (२ ऑक्टोबर, बुधवार) सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आमिर त्याची आई झीनत हुसैन यांच्याबरोबर रीना दत्ता यांच्या घरी पोहोचला. रीना यांच्या या दुःखद प्रसंगी आमिर आपल्या पूर्वाश्रमीच्या पत्नीबरोबर उभा आहे. आमिर आणि त्याच्या आईचा रीना दत्ता यांच्या घराबाहेर पडतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रीना दत्ता यांचे वडील एयर इंडियामध्ये सीनिअर ऑफिसर होते. वडिलांच्या निधनामुळे त्या शोकसागरात बुडाल्या आहेत. आमिर खानबरोबर त्याच्या आईनेही रीना यांची भेट घेतली. ज्या कधीकाळी त्यांच्या सून होत्या. त्यांनी रीना यांचं सांत्वन केलं. (Aamir Khan ex wife Reena Dutta Father Passed Away)
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये आमिरची आई स्वतः किती वयस्कर आहेत आणि त्यांनाही चालायला फिरायला अवघड होत असल्याचं स्पष्ट दिसत आहे. आधार घेत त्या गाडीतून उतरताना दिसत आहेत. रिना दत्तांच्या वडिलांच्या निधनानंतर सोशल मीडियावर काही भावूक करणारे व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहेत. व्हिडीओवर चाहते श्रद्धांजली वाहत आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओखाली अनेक नेटकरी त्यांच्याबद्दलच्या आठवणींना उजाळा देत आहेत. तसंच त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वनही करत आहेत. आमिर खान आणि रीना यांनी १९८६ मध्ये गुपचूप लग्न केले होते. या लग्नापासून त्यांना जुनैद व आयरा खान ही दोन मुले आहेत. २००२ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला.
आणखी वाचा – मुलगी झाली हो! खुशबू तावडे व संग्राम साळवी यांना कन्यारत्न, कुटुंबामध्ये आनंदाचं वातावरण
असे म्हटले जाते की, आमिरने पहिले लग्न केले तेव्हा रीना अवघ्या १९ वर्षांची होती. आमिर आणि रीनाने त्यांच्या लग्नाची बातमी अनेक दिवस घरच्यांपासून लपवून ठेवली होती. आमिर जेव्हा ‘कयामत से यमत तक’ या चित्रपटाचे शूटिंग करत होता, तेव्हा त्याचे लग्न झाले होते. हा चित्रपट प्रदर्शित होण्याच्या एक वर्ष आधीच दोघांचे अफेअर सुरू झाले होते. दोन्ही कुटुंबात मतभेद असल्याने लग्न शक्य वाटत नव्हते. त्यानंतर एके दिवशी आमिर रीनासोबत कोर्टात पोहोचला आणि नोंदणीकृत विवाह झाल्यानंतर दोघेही आपापल्या घरी परतले.
असे म्हटले जाते की, रीनाचे वडील या नात्यावर अजिबात खूश नव्हते. रीनाचे वडील आपल्या मुलीचे लग्न झाल्यावर आजारी पडले होते. यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले. पण आमिरने आपल्या वागण्याने त्यांचे मन जिंकले. खरं तर, जेव्हा ते रुग्णालयात दाखल करण्यात झाले तेव्हा आमिरने सासऱ्यांची खूप चांगली सेवा केली आणि त्यांचे मन जिंकले.