शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Bigg Boss Marathi : “मेरा सूरज कभी नहीं डुबेगा”, राखी सावंतचा सूरजला पाठिंबा, व्हिडीओ शेअर करत म्हणाली, “तोच जिंकणार कारण…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑक्टोबर 1, 2024 | 7:30 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bigg Boss Marathi Season 5 rakhi sawant support suraj chavan

'बिग बॉस मराठी'मधील सूरज चव्हाणला राखीचा फुल्ल सपोर्ट

Bigg Boss Marathi Season 5 :   ‘बिग बॉस’ आणि राखी सावंत हे समीकरण साऱ्यांना माहित आहे. ‘बिग बॉस’मुळे राखी सावंत खऱ्या अर्थाने लोकप्रिय झाली. ‘बिग बॉस’च्या प्रत्येक पर्वात राखीने सहभाग घेतला. स्पर्धक म्हणून राखी किती उत्तम आहे हे साऱ्यांनाच माहित आहे. अशातच नुकतीच राखी स्पेशल पाहुणी म्हणून ‘बिग बॉस मराठी’ सीझन ५ मध्ये आली होती. यावेळी तिने स्पर्धकांसह धमाल-मस्ती केलेली पाहायला मिळाली. प्रत्येक स्पर्धकाशी तिने संभाषण करत त्यांची फिरकी घेतलेली पाहायला मिळाली. यावेळी राखीने निक्कीची चांगलीच पोलखोलही केली. राखीने आता ‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर येताच एक व्हिडीओ शेअर केला आहे.

राखीने हा व्हिडीओ शेअर करत सूरजचं कौतुक केलेलं पाहायला मिळालं. टिकटॉक स्टार असल्यापासून ते ‘बिग बॉस’स्पर्धक असेपर्यंतचा त्याचा प्रवास पाहणं रंजक ठरत आहे. सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असणारे सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरला ‘बिग बॉस’च्या घरात मोठी संधी मिळाली आहे. दरम्यान, टिक टॉक स्टार सूरज चव्हाणचा जलवा ‘बिग बॉस’च्या घरात पाहायला मिळतोय. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर असलेल्या सूरज चव्हाणने टिकटॉक आणि त्यानंतर इंस्टाग्रामवरील आपल्या खास शैलीतील व्हिडीओने धुमाकूळ घातला.

आणखी वाचा – Video : पार्टीत नाचत होता प्रसाद जवादे, बायको न सांगता थेट पोहोचली अन्…; व्हिडीओ व्हायरल

View this post on Instagram

A post shared by Majja (@its.majja)

गोलीगत धोका असं खास शैलीत बोलणारा सूरज सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत असतो. ‘बिग बॉस’च्या घरात आल्यानंतर सूरजला प्रेक्षकांचाही भरभरुन प्रतिसाद मिळताना पाहायला मिळाला. एका छोट्याशा खेडेगावातून आलेल्या सूरजने स्व मेहनतीने आणि त्याच्या कलेने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. त्यामुळेच प्रेक्षकांच्या मनात घर करणाऱ्या सूरजचे नाव सर्वत्र घेतलं जाताना दिसते. आता राखीनेही सूरजला भरभरुन पाठिंबा दिलेला पाहायला मिळत आहे.

आणखी वाचा – “मागून कधीच मान मिळवला नाही”, जान्हवीने केलेल्या अपमानावर पॅडी यांचं भाष्य, म्हणाले, “अजूनही माफी नाहीच”

राखीने व्हिडीओ शेअर करत असं म्हटलं आहे की, “हॅलो. तुम्ही सगळे कसे आहात?. मी मराठी ‘बिग बॉस’मध्ये गेले होते. तर मला असं वाटतंय की, सूरज चव्हाण निवडून येणार आहे. तोच ट्रॉफी जिंकणार आहे. तोच हा शो जिंकणार आहे. मला सर्व महाराष्ट्राला आणि सगळयांना सांगायचं आहे, की सूरज चव्हाणला वोट करा. भरपूर वोट करा. आपला मुलगाच जिंकून यायला पाहिजे. जस तो बोलतो ते मला आवडतं. तो एकदम निरागस मनाचा आहे. क्युट आहे. त्याला भरपूर वोट करा, तोच जिंकायला हवा. जय महाराष्ट्र. ‘बिग बॉस मराठी’ सूरजला जिंकवा. मेरा सूरज कभी नही डुबेगा और तू जितेगा”, असं म्हणत तिने सूरजचं भरभरुन कौतुक केलं.

Tags: bigg boss marathibigg boss marathi season 5rakhi sawant support suraj chavan
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
02 October 2024 Wednesday daily horoscope auspicious combination of Brahma yoga, including Virgo increase in wealth of 'these' five signs know more

02 October Horoscope : ब्रह्मयोगाचा शुभ संयोग झाल्याने कन्या राशीसह ‘या’ पाच राशींच्या संपत्तीत होणार वाढ, जाणून घ्या...

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.