Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या नव्या पर्वात स्पर्धकांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. यंदाच्या या पर्वातील स्पर्धक बरेच चर्चेत असलेले पाहायला मिळत आहेत. आता या हे पर्व शेवटच्या टप्प्यात आले असून या वेळी नॉमिनेशनमधून पॅडी कांबळेला एक्झिट घ्यावी लागली. पॅडीचं नॉमिनेट होणं हे सगळ्यांच्या पचनी पडलं नाही. अनेकांनी या कार्यक्रमातील त्याची एक्झिट चुकीची असल्याचेदेखील म्हंटले आहे. तसेच प्रेक्षकांनी सोशल मीडियाच्या माध्यामातून नाराजीदेखील व्यक्त केली आहे. तो बाहेर पडल्यानंतर अनेक माध्यमांबरोबर त्याने संवाद साधला. यावेळी त्याने घरात घडलेल्या अनेक प्रसंगाबद्दल भाष्य केले आहे. निक्की व जान्हवी यांच्याबद्दल तो भाष्य करताना दिसत आहे.
घरबाहेर आल्यानंतर पॅडीने माध्यमांना मुलाखती दिल्या. नुकतीच त्याने ‘इट्स मज्जा’ला मुलाखत दिली. यामध्ये त्याने निक्की व जान्हवी यांनी त्याच्या करियरबद्दल केलेल्या अपमानाबद्दल भाष्य केले आहे. त्याला विचारले गेले की, “घरामध्ये तुमच्या कामाबद्दल जान्हवी व निक्की यांनी वादग्रस्त वक्तव्य केले तेव्हा तुम्हाला वाईट वाटलं असणारच, पण तुम्ही खूप शांत राहिलात मात्र सोशल मीडियावर अनेकांनी तुम्हाला पाठिंबा दिला, तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल?”, त्यावर पॅडीने उत्तर दिले की, “कोणाचाही पाठिंबा मिळवण्यासाठी मी असं केलं नाही. माझा स्वभावच असा आहे. पण भांडण केल्यानंतर तुमचा झालेला अपमान काही कमी होणार नाही किंवा ती गोष्ट मिटणार नव्हती. पण ती बोलली ते बोलली ते सगळं बाहेर छापलं गेलं होतं.
पुढे तो म्हणाला की, “त्यामुळे मी चीडचीड करुन काहीही फायदा नाही. पण मी विचार करतो की माझं महत्त्व मला जर वाढवायचं असेल तर मला तेवढी मेहनत करावी लागेल. तसेच मी मागून मान कधीही मिळवणारा माणूस नाही. मी माझं काम करतो आणि आपोआप मान मिळवतो. या गोष्टी मी भूतकाळातदेखील केल्या आहेत. त्यामुळे मी जान्हवीला काही बोललो नाही याचा अर्थ माझं मन खूप मोठं आहे, मी क्षमाशील आहे असं काही नाही. माझा मूळ स्वभावच तो आहे”.
तसेच त्याला विचारले की, “तु जान्हवी व निक्कीला माफ केलं आहेस का?”, त्यावर त्याने उत्तर दिलं की, “नाही. मनातून मी त्यांना माफ केलं नाही”. दरम्यान पॅडीच्या या कामाचे कौतुकही मोठ्या प्रमाणात केले जात आहे.