Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात यंदाच्या विकेंडला एक्स स्पर्धकांनी हजेरी लावत कार्यक्रमाची रंगत वाढविली. ‘बिग बॉस’च हे यंदाचं पर्व विशेष धुमाकूळ घालताना दिसलं. त्यात भर घालायला ‘बिग बॉस’च्या एक्स स्पर्धकांची घरात एंट्री झालेली पाहायला मिळाली. dramaqween राखी सावंतच्या एंट्रीने साऱ्यांना आश्चर्याचा धक्का बसला. राखीच्या एंट्रीने निक्कीची हवा टाईट झालेली पाहायला मिळाली. घरात येताच राखीने निक्कीला चांगलंच सुनावलं आणि तिची खरडपट्टी काढली. राखीने घरात पाऊल ठेवल्यावर निक्कीची फिरकी घेण्यास सुरुवात केली.
इतकंच नव्हे तर राखीने घरातील इतर सदस्यांचीही बोलती बंद केली. सुरुवातीला घरात येताच ती निक्कीला म्हणाली, “तू माझे कपडे चोरले?, माझी बाई गेली कुठे तेच मी म्हणत होते तर ती इथे आहे. सस्ती राखी सावंत. हा काय प्रकार? ही त्या सीझनमध्ये होती. तिथे एकाही मुलाला सोडलं नाही. ओ वर्षा ताई ऐकलंत का? या कोपऱ्यात आय लव्ह यू. त्या कोपऱ्यात आय लव्ह यू बोलून ही शेवटपर्यंत राहिली आणि बाकी सगळे बाहेर गेले”.
राखी पुढे सर्व सदस्यांची फिरकी घेते. शिवाय निक्कीची आई आली तेव्हा त्यांनी अरबाजचा साखरपुडा झाला आहे असं निक्कीला सांगितलेलं असतं. हे ऐकून निक्कीचा पारा चढतो. अरबाज खोटं बोलला असं तिला वाटत असतं. यावरुन आता राखीही निक्कीला विचारते, “अरबाजचा साखरपुडा झालाय हे खरंय का?”. यावर निक्की काहीच उत्तर देत नाही. हे ऐकून इतर सदस्यही चकित होतात. हे पाहून पुढे राखी म्हणते, “ही कोपऱ्यात बसून रडत होती. त्याचा कप घेऊन बसलेली. सारखं मिस करतेय, मिस करतेय. राणी एकटी पडली माझा राजा बाहेर आहे असं सगळं सुरु होतं”.
पुढे राखी मस्करीत “प्रत्येक सीझनमध्ये तुझ्या फिलिंग्ज बाहेर येतात. तुम्ही बाहेर जाऊन हे सगळं आधीच्या सीझनचं बघा. ही मस्त परफ्युम मारते. ती मुलं पटवण्याचा परफ्युम मारते आणि जाते मग, हिला कोणीच नॉमिनेट करत नाहीत”, असंही गमतीत म्हणते. राखी गेल्यावर सगळेच जण बसलेले असतात तेव्हा निक्की सर्वांना म्हणते, “आधी आई बोलली आता राखी बोलली म्हणजे नक्कीच त्याच बाहेर काहीतरी असणार. तो जर माझ्या समोर आला तर माझा बांध फुटेल. मी आतून खूप खवळलेय. तो ग्रँड फिनालेला येणार तेव्हा मी त्याला कसं फेस करु समजत नाहीय”. यावर घरातील मंडळी निक्कीला समजवतात.