Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस मराठी’चा शेवटचा आठवडा सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाच लवकरच ग्रँड फिनाले होणार असून स्पर्धक मंडळी आता शेवटच्या आठवड्यात धमाल मजा-मस्ती करताना दिसतात. एकूण १६ स्पर्धकांनी ‘बिग बॉस’च्या घरात सहभाग घेतला होता तर एका वाईल्ड कार्ड स्पर्धकाची एन्ट्री झालेली पाहायला मिळाली. आता ‘बिग बॉस’च्या घरात तब्बल आठ स्पर्धक राहिले आहेत. यंदा भाऊच्या धक्का होणार नसल्याचं घोषित करण्यात आले कारण भाऊचा धक्काच्या सूत्रसंचालकाची जबाबदारी पार पडणारा अभिनेता रितेश देशमुख वैयक्तिक कामानिमित्त परदेशात गेला असल्याचे समोर आलं.
त्यामुळे यंदा भाऊचा धक्का न होता ‘बिग बॉस’च्या घरात कल्ला होणार असल्याच समोर आलं. सुरुवातीला फॅमिली वीक झाला त्यानंतर बिग बॉसच्या घरात एक्स स्पर्धकांचा कल्ला झालेला पाहायला मिळाला. यावेळी राखी सावंत, अभिजीत बिचुकले, अनिल थत्ते या स्पर्धकांनी घरात येत स्पर्धकांचे मनोरंजन केलं आणि त्यांचं कौतुकही केलेलं पाहायला मिळालं. तर यानंतर आता समोर आलेल्या प्रोमोमध्ये आणखी एका पाहुणे कलाकारांची एन्ट्री झालेली पाहायला मिळतेय आणि ही पाहुणे कलाकारांची जोडी म्हणजेच अभिनेत्री प्राजक्ता माळी आणि अभिनेता गश्मीर महाजनी.
आणखी वाचा – एमसी स्टॅन गायब?, मुंबई ते सूरतपर्यंत लावण्यात आले पोस्टर, पब्लिक स्टंट की आणखी काही?
प्राजक्ता व गश्मीरच्या येण्याने स्पर्धकांमध्ये कमालीचा आनंद पाहायला मिळाला. याचा एक प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये असं पाहायला मिळत आहे की, प्राजक्ता व गश्मीर ‘बिग बॉस’च्या घरात येतात आणि स्पर्धकांसह एक टास्क खेळताना दिसत आहे. निलेश साबळे सर्वांना या खेळाची पूर्वसूचना देताना दिसत आहे. भाषेच्या तालावर असं या खेळाचं नाव आहे. प्रोमोमध्ये पाहिल्याप्रमाणे यावेळी गाणं नाही तर त्यावर हीप हॉप डान्स करण्यासही सांगितलं जातं. अभिजीत गश्मीरसह हिप हॉप डान्स करताना दिसतोय तर त्यानंतर निकी तिच्या हटके अंदाजानं गश्मीरला भुरळ घालताना दिसतेय.
एकूणच हे मजेशीर वातावरण ‘बिग बॉस’च्या घरात पाहायला मिळालं आहे. ‘बिग बॉस’च्या घरात प्राजक्ता व गश्मीर त्यांच्या आगामी फुलवंती या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आले आहेत. लवकरच त्यांचा हा बिग बजेट चित्रपट रसिक प्रेक्षकांच्या भेटीसाठी येणार आहे. आता प्राजक्ता गश्मीरसह ही स्पर्धक मंडळ आणखी कोणती धमाल करणार हे पाहणं ‘बिग बॉस’मध्ये रंजक ठरेल.