रविवार, जून 8, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘धर्मवीर-२’चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, पाहिल्याच दिवशी कमावले इतके कोटी, चित्रपटाची रेकॉर्ड ब्रेक कमाई

Saurabh Moreby Saurabh More
सप्टेंबर 28, 2024 | 5:11 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Dharmaveer 2 marathi movie First Day Collection

'धर्मवीर-२’ ने पहिल्या दिवशी १.९२ कोटी रुपये कमावले असून हा चित्रपट २०२४ मध्ये सर्वाधिक ओपनिंग करणारा चित्रपट आहे .

Dharmaveer 2 : धर्मवीर आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ या चित्रपटाने चाहत्यांच्या मनावर गारुड घातले. अभिनेता प्रसाद ओकने या चित्रपटात आनंद दिघे यांची भूमिका साकारत प्रेक्षकांची मनं जिंकली होती. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवरही तूफान प्रतिसाद मिळाला होता. या चित्रपटाच्या शेवटी त्याच्या दुसऱ्या भागाची चाहूल प्रेक्षकांना देण्यात आली होती. तेव्हापासून अनेक चाहते या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची वाट पाहत आहेत. या चित्रपटाच्या अभूतपूर्व यशानंतर आता ‘धर्मवीर-२’ही प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ‘धर्मवीर-२’ बरोबरचा ज्युनियर एनटीआर, जान्हवी कपूर आणि सैफ अली खानचा ‘देवरा’ चित्रपटदेखील प्रदर्शित झाला होता. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर या दोन्ही चित्रपटांमध्ये थेट टक्कर झाली होती. त्यात बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी धर्मवीर ‘देवरा’वर भारी पडला आहे. (Dharmaveer 2 First Day Collection)

प्रवीण तरडे दिग्दर्शित ‘धर्मवीर-२’ चित्रपटात आनंद दिघेंची भूमिका अभिनेता प्रसाद ओक आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भूमिका क्षितिश दातेने साकारली आहे. या चित्रपटाने पहिल्या दिवशी किती कमाई केली, याची आकडेवारी समोर आली आहे. चित्रपटाचे निर्माते मंगेश देसाई यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट करून यासंदर्भात माहिती दिली आहे. मंगेश देसाई यांनी चित्रपटाचे पोस्टर इन्स्टाग्रामवर शेअर केले आहे आणि या पोस्टरमध्ये ‘धर्मवीर-२’ ने पहिल्या दिवशी १.९२ कोटी रुपये कमावले असून हा चित्रपट २०२४ मध्ये सर्वाधिक ओपनिंग करणारा चित्रपट आहे . असं लिहिलेलं पाहायला मिळत आहे.

View this post on Instagram

A post shared by Mangesh Desai (@mangeshdesaiofficial)

आणखी वाचा – Bigg Boss च्या घरात अनिल थत्तेंची जोरदार एन्ट्री, निक्कीमुळेच शो चालत असल्याचा केला दावा, वर्षा उसगांवरांना बघताच म्हणाले…

तसंच या पोस्टरबरोबर त्यांनी कॅप्शनमध्ये “पहिल्याच दिवशी नेट १.९२ कोटी कमवून ‘धर्मवीर-२’ चित्रपट ठरला या वर्षीचा सगळ्यांत जास्त कमाई करणारा पहिला मराठी चित्रपट. संपूर्ण टीम आणि प्रेक्षकांचे मनापासून अभिनंदन!” असं म्हटलं आहे. ‘धर्मवीर’ चित्रपटात आनंद दिघेंचं जीवनचरित्र दाखवलं होतं. त्यानंतर आता ‘धर्मवीर-२’ मध्ये त्यांच्या हिंदुत्त्वाची गोष्ट दाखवली गेली आहे. ‘धर्मवीर-२’  हा चित्रपट ९ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार होता, पण त्यावेळी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली होती. त्यामुळे हा चित्रपट २७ सप्टेंबर रोजी प्रदर्शित करण्यात आला.

आणखी वाचा – व्यवसाय करत नवऱ्याला दिली साथ, काही वर्ष डेट केल्यानंतर लग्नाचा निर्णय अन्…; अभिजीत सावंतने सांगितली लव्हस्टोरी

दरम्यान, ‘धर्मवीर-२’ या चित्रपटाची निर्मिती ‘झी स्टुडिओज’ आणि ‘साहील मोशन आर्ट्स’ या निर्मिती संस्थेचे मंगेश देसाई, उमेश कुमार बन्सल यांनी केली आहे. तसंच कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शनाची जबाबदारी प्रवीण तरडे यांनी निभावली आहे. तर कॅमेरामन म्हणून महेश लिमये यांनी चित्रपटाचे काम पाहिले आहे.

Tags: Dharmaveer 2 First Day CollectionDharmaveer 2 First Day Collection Marathi NewsDharmaveer 2 First Day Collection News
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
samir soni married life

वर्षभरातच घटस्फोट, दुसरा साखरपुडाही मोडला, पुन्हा अभिनेत्रीशी थाटला संसार अन्…; आता कसं आयुष्य जगतो सुप्रसिद्ध अभिनेता

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.