२००४ साली भारतात टेलिव्हिजनवर एक सिंगिंग रिअॅलिटी शो आला होता. त्या शोचं नाव होतं इंडियन आयडॉल. अमेरिकन टीव्ही शो अमेरिकन आयडॉलच्या धर्तीवरच या शो ची निर्मिती करण्यात आली होती. आणि या शोच्या पहिल्या सिझनचा विजेता होता महाराष्ट्राचा अभिजीत सावंत. या शोच्या माध्यमातून मुंबईच्या अभिजीतचा आवाज देशभरात पोहोचला. हा टीव्ही शो तर अख्या भारतभर तुफान हिट ठरला होता. तो विजेता झाला आणि लगेचच काही दिवसांत त्याचा ‘मोहब्बतें लुटाऊँगा’ नावाचा नवीन अल्बम आला. लोकांनी तो अल्बमही अक्षरशः डोक्यावर घेतला. त्याच्या गाण्याने त्याला केवळ प्रसिद्धीच नाही तर अनेक संधी सुद्धा मिळवून दिल्या. (Abhijeet Sawant Lovestory)
एकेकाळचा हा आयडॉल मध्यंतरी मात्र प्रसिद्धी झोतापासून खूपच दूर राहिला. त्यामुळे तो नक्की कुठे गेला? याबद्दलच्या अनेक चर्चा सर्व माध्यमांमध्ये झाल्या होत्या. अशातच त्याने ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वात एण्ट्री घेतली आणि तो पुन्हा एकदा चर्चेत आला. या घरातील त्याच्या खेळाचे व स्वभावाचे चाहत्यांकडून कौतुक होत आहे, इतकंच नव्हे तर सोशल मीडियावर तोच या पर्वाचा विजेता होणार अशा चर्चा होताना पाहायला मिळत आहे. अशातच त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे आणि यामध्ये त्याने त्याची लव्हस्टोरी सांगितली आहे.
या व्हिडीओमध्ये त्याने असं म्हटलं आहे की, “माझ्या लव्हस्टोरीमध्ये असे अनेक वेगवेगळे क्षण आले. आम्ही कॉलेजमध्ये एकत्र होतो. तेव्हा आम्ही एकत्र अभ्यास घ्यायचो. अनेकदा ती माझा अभ्यास घ्यायची. ती मला शिकवायची. तेव्हापासूनच आम्ही एकमेकांच्या प्रेमात पडलो आणि आमची लव्हस्टोरी हळहळू सुरु झाली. तेव्हा तिला मी पहिले गिफ्ट ही गाण्यांची कॅसेट दिली होती. माझ्या आवडीच्या त्यावेळच्या दहा रोमॅंटिक गाण्यांची कॅसेट तिला मी गिफ्ट म्हणून दिली होती”.
तसंच या व्हिडीओच्या खाली कॅप्शनमध्ये त्याने असं म्हटलं आहे की, “आमच्या लव्हस्टोरीची सुरुवात आमच्या कॉलनीमध्ये झाली. बरेच किस्से आहेत. पण त्यातला माझा एक आवडीचा क्षण हा आहे…शिल्पा नेहमीच माझा एक खंबीर पाठिंबा म्हणून राहिली आहे…. आमची लव्हस्टोरी हळूहळू रंजक होत गेली आणि आमचे एकमेकांवरील प्रेम हे प्रत्येकवेळी अधिक घट्ट होतं गेले”. दरम्यान या व्हिडीओला अनेकांनी लाईक्स व कमेंट्स करत चांगलाच प्रतिसाद दिला आहे.
अभिजीतच्या पत्नीचं नाव शिल्पा एडवणकर-सावंत असं आहे. शिल्पा यांचा अस्मी या नावाने केकचा बिझनेस आहे. याची माहिती त्यांनी स्वत:च्या इन्स्टाग्राम बायोमध्ये लिहिलेली आहे. शिवाय अस्मि या नावाने त्यांचं एक वेगळं इन्स्टाग्राम अकाउंट आहे. यामध्ये त्यांनी बनवलेले स्वादिष्ट, सुंदर थीम केक पाहायला मिळत आहेत. हे सुंदर केकची ती ऑनलाईन ऑर्डरही स्वीकारते.