रविवार, जून 8, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

मराठी मालिकेमध्ये इरीनाची एन्ट्री, प्रोमोमधील डायलॉगने वेधलं लक्ष, म्हणाली, “राम कृष्ण हरी”

Saurabh Moreby Saurabh More
सप्टेंबर 28, 2024 | 1:58 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bigg Boss Marathi 5 fame Irina Rudakova entry in Colors Marathi Indrayani serial see the details

Bigg Boss Marathi 5 फेम इरीना रुडाकोवाची कलर्स मराठी वरील इंद्रायणी मालिकेत एण्ट्री झाली आहे

Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या नव्या पर्वाचा ग्रँड प्रीमिअर सोहळा २८ जुलै २०२४ रोजी प्रदर्शित करण्यात आला. ‘बिग बॉस’च्या घरात अनेक कलाकार आणि इन्फ्लुएन्सर्सनी प्रवेश केला. तसंच या घरात परदेसी गर्लनेदेखील तिच्या बोल्ड आणि हटके अंदाजात ‘बिग बॉस मराठी’मध्ये ग्रँड एन्ट्री केली होती. परदेसी गर्लचा प्रोमो शेअर केल्याबरोबर नेटकऱ्यांनी ती इरिना रुडाकोवा असल्याचा अंदाज लावला होता. ग्रँड प्रिमिअरमध्ये इरिनाने एन्ट्री करताच तिच्या चाहत्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. इरिनाही मॉडेल आणि अभिनेत्री आहे. इरिनाला सोशल मीडियावरून प्रसिद्धी मिळाली. त्याचबरोबर नुकतीच ती एका मराठी रॅप सॉन्गमध्ये झळकली होती. त्यानंतर ती मराठी इंडस्ट्रीतही लोकप्रिय झाली. (Bigg Boss Marathi 5 fame Irina Rudakova Serial)

कलर्स मराठीवर सध्या ‘इंद्रायणी’ ही मालिका जोरदार सुरु आहे. प्रेक्षकांकडून या मालिकेला चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. या मालिकेतील छोटी इंदू आपल्या निरागस अभिनयाने सर्वांची मनं जिंकत आहे. अशातच आता यात बिग बॉस मराठी फेम इरीना रुडाकोवाची एन्ट्री होणार आहे. नुकताच तिच्या या एन्ट्रीचा एक प्रोमो  सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. या प्रोमोमध्ये इरीना इंद्रायणीच्या शोधात असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यानंतर ती इंद्रायणीला भेटताच “राम कृष्ण हरी” असंही म्हणते. मालिकेतील इरीनाच्या एन्ट्रीमुळे तिच्या चाहत्यांना भलताच आनंद झाला आहे.       

View this post on Instagram

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : “शोमधून आल्यानंतर रिलेशनच संपवलं”, अरबाज पटेलचा युटर्न, गर्लफ्रेंडबरोबर ब्रेकअप केल्याचं भाष्य, म्हणाला, “निक्कीला आता…”

‘बिग बॉस मराठी’च्या घरात इरीना चांगलीच गाजली, तिच्या मराठी बोलण्याच्या व मराठी शिकण्याच्या प्रयत्नांचे कौतुक करण्यात आले. ‘बिग बॉस मराठी’च्या घरात ती टास्कही उत्तम खेळली. मात्र चौथ्या आठवड्यात या घरातील तिचा प्रवास संपला. पण मोजक्या दिवसांतही तिने बिग बॉस मराठीच्या प्रेक्षकांची मनं जिंकली होती. ‘बिग बॉस मराठी’मधून बाहेर पडल्यानंतर आता इरीना पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कलर्स मराठी या वाहिनीद्वारेच पुन्हा ती प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्यामुळे तिचे चाहते चांगलेच उत्सुक आहेत हे नक्की…

आणखी वाचा – “आर्थिक-समाजिक समानता लोकशाही देऊ शकली नाही पण…”, सूरजबाबत मराठी अभिनेत्याची पोस्ट, म्हणाला, “एका शोने त्याला…”

दरम्यान, इरिनाबद्दल बोलायचे झाले तर ‘इरा राय’ या नावाने तिचे सोशल मीडियावर अकाउंट असून दीड लाखांपेक्षा अधिक फॉलोवर्सही आहेत. ती ‘छोटी सरदारनी’ या हिंदी मालिकेतूनही प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. इरीना ‘आयपीएल’पासून चर्चेत आली आहे. तिने ‘आयपीएल’मध्ये हैदराबाद संघाकडून चिअर लीडर म्हणून काम केलं आहे. त्याचबरोबर इरिना योग प्रशिक्षकसुद्धा आहे. अशातच आता ती अभिनेत्रीच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Tags: bigg boss marathi 5Indrayani SerialIrina Rudakova
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
vivek agnihotri viral post

"बड्या अभिनेत्याला चित्रपटातून काढून टाकलं आणि…", विवेक अग्निहोत्रींचा मोठा निर्णय, म्हणाले, "त्याचा मॅनेजर जास्तच…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.