शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

गरोदर आहे की नाही तपासण्यासाठी सुप्रसिद्ध अभिनेत्याने अंकिता लोखंडेच्या पोटाला लावला हात, व्हिडीओ पाहून भडकले नेटकरी

Saurabh Moreby Saurabh More
सप्टेंबर 27, 2024 | 5:26 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Ankita Lokhande co-star Ali Goni hinted at her pregnancy actress got a bit angry.

अली गोनीने अंकिता लोखंडेच्या प्रेग्नेंसीकडे इशारा केल्यानंतर अभिनेत्रीला थोडा राग आला.

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री अंकिता लोखंडे सध्या ‘लाफ्टर शेफ’ या शोमध्ये दिसत आहे. या शोपूर्वी अंकिता लोखंडे ‘बिग बॉस १७’ मध्ये दिसली होती. या शोमध्ये तिच्याबरोबर तिचा पती विकी जैनही सहभागी झाला होता. या शोमध्ये दोघांमध्ये जोरदार भांडण, वादावादी झालेली पाहायला मिळाली. त्यांच्या नात्यातील अनेक चढ-उतार पाहून विकीच्या आईनेही शोमध्ये येऊन अंकिताला समजावले होते. या शोनंतर चाहत्यांना असे वाटू लागले की, कदाचित त्यांचे नाते आता टिकणार नाही, परंतु तसे झाले नाही आणि कालांतराने त्यांचे नाते आणखी घट्ट झाले. ‘लाफ्टर शेफ’ या शोमध्ये अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांनी लोकांची मने जिंकली.

अंकिता-विकी ‘बिग बॉस’मध्ये अनेकदा भांडताना दिसले, मात्र आता या शोमध्ये त्यांचा नवा चेहरा पाहायला मिळाला. दोघे मस्ती करताना आणि लोकांना खूप हसवताना दिसत आहेत. अशातच अंकिताचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे आणि या व्हिडीओमधून तिच्या प्रेग्नन्सीबद्दलचा खुलासा झाला आहे. नुकताच शोमधील अंकिताचा सहकलाकार अली गोनीने अंकिताच्या प्रेग्नेंसीकडे इशारा केला होता, ज्यानंतर अभिनेत्रीला थोडा राग आला. अंकिता लोखंडेच्या फॅन पेजवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये अली गोनी अंकिताची मस्करी करताना दिसत आहे. अंकिता सेटवर एक-एक करुन सगळ्यांना मिठी मारते. जेव्हा ती अलीच्या समोर येते तेव्हा तो गमतीने विचारताना “प्रेग्नंट आहे का?” असं विचाऱतो.

View this post on Instagram

A post shared by Ankita Lokhande Fanpage 🧿 (@ankitalokhandee17)

आणखी वाचा – शेवटी बापच तो! लेकींना पाहून स्वत:ला सावरु शकला नाही पॅडी, एकमेकांना घट्ट मिठी मारली तेव्हा…

अली गोनीच्या मस्करीवर अंकिता आधी हसली आणि नंतर चिडून म्हणाली की, “वेडा झाला आहेस का?”. संपूर्ण टीम आणि कॅमेऱ्यासमोर अलीचे बोलणे ऐकून तिला आनंद झाला नसल्याचे तिच्या प्रतिक्रियेवरून स्पष्ट दिसत आहे. तशा अनेक कमेंट्सही नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर व्यक्त केल्या आहेत. याबद्दल एकाने असं म्हटलं आहे की, “अली हा डॉक्टर किंवा हकीम आहे का? जो तिच्या पोटाला हात लावून ती प्रेग्नंट आहे का? हे विचारत आहे”. पुढे एकाने असं म्हटलं आहे की, “जर तुम्ही खरोखरच प्रेग्नंट असाल मॅडम, तर तुमचे अभिनंदन”. तसंच एकाने “तुम्ही गर्भधारणेची किती वेळा चेष्टा कराल?” अशी कमेंट केली आहे. तर एकाने “अंकिता प्रत्येक शोमध्ये प्रेग्नंट होते” अशी प्रतिक्रिया दिली आहे.

आणखी वाचा – यालाच म्हणतात संस्कार!, चप्पल काढत सूरजच्या कुटुंबियांची घरात एन्ट्री, Bigg Boss च्या इतिहासात पहिल्यांदाच घडलं असं काही की…

दरम्यान, अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांचे २०२१ मध्ये लग्न झाले होते. लग्नाआधी दोघेही अनेक वर्षे एकमेकांना डेट करत होते. २०१९मध्ये अंकिताने विकीबरोबरच्या तिच्या नात्याबद्दल सांगितले. त्यांच्या लग्नाला ३ वर्षे झाली असून आता या व्हिडिओच्या आधारे अंकिता आई होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या बातमीमुळे तिचे अनेक चाहते खुश आहेत.


Tags: ankita lokhandeAnkita Lokhande Entertainment NewsAnkita Lokhande Pregnancy
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Housefull 5 Review
Entertainment

Housefull 5 Review : ‘हाऊसफुल ५’ पाहावा की नाही?, प्रेक्षकांनी चित्रपटाचा ट्विस्टच सांगितला, खरंच तुफान गर्दी आहे का?

जून 6, 2025 | 11:53 am
Niranjan Kulkarni Wedding Video
Entertainment

‘आई कुठे…’ फेम सुप्रसिद्ध अभिनेत्याचं थाटामाटात लग्न, पारंपरिक पद्धतीने पार पडला विवाहसोहळा, लूकची चर्चा

जून 6, 2025 | 11:42 am
Priya bapat online shopping experience
Entertainment

प्रिया बापटला Blinkit ने पाठवला सडलेला कोबी, फोटोही केला शेअर, म्हणाली, “घाणेरड्या दर्जाच्या भाज्या…”

जून 6, 2025 | 11:07 am
muzammil ibrahim  On deepika padukone
Entertainment

तिने प्रपोज केलं, दोन वर्ष रिलेशनमध्ये होतो आणि…; दीपिका पदुकोणच्या पूर्वाश्रमीच्या बॉयफ्रेंडचा खुलासा, कोण आहे मुजम्म‍िल इब्राहिम?

जून 6, 2025 | 11:02 am
Next Post
Paaru Marathi Serial New Promo

Paaru Marathi Serial : प्रितम-प्रियाची लग्नगाठ आबासाहेब स्वत: बांधणार?, अहिल्यादेवींचा लेक असल्याचं सत्य समोर येणार का? मालिकेला रंजक वळण

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.