रविवार, जून 8, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Bigg Boss च्या घरात सूरजला भेटायला आल्या बहिणी व आत्या, ‘ते’ दृश्य पाहून सगळ्यांनाच अश्रू अनावर, निक्कीने तर मिठी मारली अन्…

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
सप्टेंबर 27, 2024 | 3:30 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bigg Boss Marathi 5 suraj chavan emotional video

'बिग बॉस'च्या घरात सूरज चव्हाणला भेटायला आल्या आत्या व बहिणी

Bigg Boss Marathi 5 :  ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचे अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. या पर्वातील सर्वच स्पर्धक मंडळी धुमाकूळ घालताना दिसत आहेत. यंदाच्या या पर्वात रील स्टारला विशेष प्राधान्य मिळालं. टिक टॉक स्टार सूरज चव्हाणचा ‘बिग बॉस’च्या घरातील येण्याने साऱ्यांच्या भुवया उंचावल्या. यावेळी सूरज चव्हाणला घरात पाहून साऱ्यांना धक्का बसला. सुरुवातीला हा मुलगा काय इथे का आला आहे?, तो नीट खेळेल का? हा विचार करुन घरातील स्पर्धकांनीही त्याला दुय्यम दर्जा दिला. मात्र नंतर सूरजचा खेळ पाहून साऱ्यांनी त्याचं कौतुक केलं. तर संपूर्ण महाराष्ट्रातूनही सूरजला भरभरुन पाठिंबा मिळताना पाहायला मिळत आहे.

सोशल मीडियावर सूरजचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. आज संपूर्ण महाराष्ट्र त्याला भरभरून वोट करताना दिसत आहेत. इतकंच नव्हे तर भाऊच्या धक्क्यावरही सूरजचं भरभरुन कौतुक करण्यात आलं. सूरजला ‘बिग बॉस’चा गेम कळायला उशीर झाला असला तरी तो माणसं ओळखायला कुठेही कमी पडलेला नाही आणि त्याची हीच गोष्ट साऱ्यांना भावली. त्याच्या साध्या भोळ्या स्वभावामुळे तो साऱ्यांच्या पसंतीस पडला. सर्वत्र सूरजचं कौतुक होताना पाहायला मिळत आहे.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : “दारु-सिगारेटला कधीच हात लावला नाही”, अरबाज पटेलचा खुलासा, म्हणाला, “आता मला २५वं वर्ष सुरु आहे आणि…”

View this post on Instagram

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

सध्या ‘बिग बॉस’च्या घरात फॅमिली वीक सुरु असलेला पाहायला मिळत आहे. नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये सूरजचे कुटुंबीय त्याला भेटायला आले आहेत. सूरजचे आई-वडील त्याला लहानपणीच सोडून गेले. त्यामुळे सूरजचा सांभाळ त्याच्या आत्या व बहिणींनी केला. आता सूरजला भेटायला ‘बिग बॉस’च्या घरात त्याच्या बहिणी व आत्या आल्याचं पाहायला मिळत आहे. त्यांना पाहून सूरजला खूप आनंद झालेला दिसला. सूरजच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहताना दिसला. त्याच्या आत्या व बहिणीच्या स्वागतासाठी तो खूप उत्सुक होता.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : डीपीने निक्कीची हात जोडून मागितली माफी, ‘ती’ एक गोष्ट पटली नाही म्हणून…; असं काय घडलेलं?

घरात एंट्री करताच एका कोपऱ्यात चपला काढल्या आणि मग त्या घरात गेल्या. त्यांची ही कृती अतिशय भावुक करणारी होती. त्यानंतर त्यांनी सूरजला घट्ट अशी मिठी मारली. भावाला पाहून बहिणींना रडू अनावर झालं तर आत्याही त्याचे मुके घेत रडताना दिसली. यावेळी सूरज मात्र खूप खुश दिसला. प्रोमोमध्ये ‘बिग बॉस’ म्हणतात की, “सूरज आपण स्वागत करुया आपल्या बहिणीचं आणि आपल्या आत्याचं”. त्यानंतर त्याच्या बहिणी सूरजला म्हणतात, “तुझ्यामुळे आज इथपर्यंत आपल्याला यायला मिळालं”.

स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Bigg Boss Marathi 5 new promo Suraj Chavan sister and family take off their slippers after enter the house

यालाच म्हणतात संस्कार!, चप्पल काढत सूरजच्या कुटुंबियांची घरात एन्ट्री, Bigg Boss च्या इतिहासात पहिल्यांदाच घडलं असं काही की…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.