शुक्रवार, मे 9, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

रुग्णालयामध्येही जाण्यासाठी परवानगी नाही, सेटवरच सगळं काही अन्…; मालिकेतील अभिनेत्रीचा इंडस्ट्रीबाबात खुलासा, काय घडलेलं?

Majja Webdeskby Majja Webdesk
सप्टेंबर 26, 2024 | 3:48 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
krystle d'souza on television industry

क्रिस्टल डिसूजाचा खळबळजनक दावा

टेलिव्हीजनवरील ‘एक हजारो मे मेरी बहना’ या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केले होते. या मालिकेमद्धे क्रिस्टल डिसुजा व निया शर्मा यांच्या प्रमुख भूमिका होत्या. दोन बहीणींमधील प्रेम असा आशय या मालिकेचा होता. या मालिकेने खूप लोकप्रियता मिळवली. क्रिस्टलला या मालिकेमुळे अधिक पसंती मिळाली. या मालिकेनंतर ती अनेक मालिका व वेबसीरिजमध्ये दिसून आली. पण आता ती अभिनय किंवा मालिकेमुळे नाही तर एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. तिने आता मनोरंजन विश्वाची पोल खोलली आहे. यामध्ये तिने कोणत्या प्रसंगांना सामोरे जावे लागले याबद्दल तिने भाष्य केले आहे. (krystle d’souza on television industry)

क्रिस्टलने नुकतीच सिद्धार्थ कननला मुलाखत दिली. यामध्ये तिने आरोग्यसंबंधी असलेल्या समस्या असतानाही खूप मेहनत केली होती. तिने २०-३० तास उभं राहून काम केलं आहे. तिने सांगितले की, “सुरुवातीला मला २५०० रुपये प्रती दिवस मिळायचे. त्यावेळी फक्त १२ तासच शूट व्हावं यासाठी कोणतेही नियम किंवा समिती नव्हती. मी न थांबता ६० तास शूट केले आहे. मी अनेकदा सेटवर पण बेशुद्ध पडले आणि टीमला रुग्णवाहिकादेखील बोलवावी लागली होती”.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi 5 : शाळेची फी भरण्यासाठी वडील विकायचे स्वतःचं रक्त, जान्हवी सांगितली माहेरची सत्य परिस्थिती, म्हणाली, “इतकं कमावायचं आहे की…”

View this post on Instagram

A post shared by Krystle Dsouza (@krystledsouza)

पुढे तिने सांगितले की, “मला सलाईन लावायचे आणि औषधं घेऊन मी पुन्हा शूटसाठी हजर व्हायचे. मला रुग्णालयात जाण्यासाठीदेखील वेळ नसायचा. ते लोक पूर्ण रुग्णालयच सेटवर आणायचे. हे सगळं मला खूप कठीण जात होतं. मी चालू शकत नव्हते. पण माझ्यासाठी कामामध्ये व्यवस्थित असणं जास्त गरजेचं होतं”.

आणखी वाचा – Video : Bigg Boss च्या घरात आई-वडील, बायको येताच डीपीच्या अश्रूंचा फुटला बांध, बाबांनी कौतुक करताच घट्ट मिठी अन्…

तसेच क्रिस्टलने सांगितले की, “मी चांगली नाही. असं मला नेहमी वाटायचं. तसेच आर्थिक समस्यादेखील मला खूप आल्या. पण टेलिव्हीजनने मला मजबूत बनवलं, आत्मविश्वास वाढवला आणि माझी वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी मदत केली. मला आता जे काही मिळालं आहे ते फक्त टेलिव्हीजनमुळे मिळालं आहे”. क्रिस्टलच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर ‘ब्रह्मराक्षस’, ‘फितरत’, ‘एक नयी पहचान’, ‘बेलन वाली बहू’ व ‘बात हमारी पक्की’ या मालिकांमध्ये दिसून आली होती.

Tags: actresskrystal d'souzatelevsion reality
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

soldier duty over marriage
Social

हळद फिटली नसतानाही जवान लग्नाच्या तिसऱ्या दिवशी कामावर रुजू, आई-वडील भावुक तर पत्नीचा खंबीर पाठिंबा, मन हेलावणारा व्हिडीओ

मे 9, 2025 | 11:22 am
Akshay Kelkar Haldi Ceremony
Entertainment

सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याला लागली हळद, घरीच कुटुंबियांसह सेलिब्रेशन, मराठी कलाकारांची हजेरी

मे 9, 2025 | 10:56 am
Which Cooking Oil Is Good
Lifestyle

‘या’ तेलामुळे कोलेस्ट्रॉलचं प्रमाण अधिकाधिक वाढतंय, जेवणात कोणतं तेल वापरणं अधिक उत्तम?, डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार…

मे 8, 2025 | 7:00 pm
Video Viral From Pakistan
Social

“आम्ही भारताला थांबवूच शकलो नाही आणि…”, पाकिस्तान नागरिकाकडूनच भारताचा जयजयकार, पाक सैन्याचं सत्य समोर आणत…

मे 8, 2025 | 4:00 pm
Next Post
Navri Mile Hitlerla zee marathi serial new promo leela will be proposed to aj aka abhiram see the details

Navri Mile Hitlerla : क्रुझवर लीला प्रेमाची कबुली देणार, ऐजेंबरोबरचं प्रेम आणखीनच बहरणार, डान्स, प्रपोझ अन्…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.