Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचे आठ आठवडे सुरळीत पार पडले आहेत. आता नववा आठवडा सुरू झाला आहे. मागील दोन आठवड्यांमध्ये घरातील दोन-दोन सदस्य ‘बिग बॉस मराठी’तून बाहेर झाल्याचं पाहायला मिळालं. सातव्या आठवड्यात आर्याने निक्कीला कानशिलात लगावल्यामुळे तिला ‘बिग बॉस’ने थेट बाहेरचा रस्ता दाखवला. त्यानंतर वैभव चव्हाणने घरचा निरोप घेतला. मग आठव्या आठवड्यात तेच चित्र पुन्हा पाहायला मिळालं. शनिवारी, २१ सप्टेंबरला झालेल्या वैद्यकीय कारणास्तव संग्राम चौगुले घराबाहेर झाला. तर अरबाज पटेलचाही या घरातला प्रवास संपला. (Ankita Walawalkar on Arbaaz Patel)
आठव्या आठवड्यात नॉमिनेट झालेल्या पाच सदस्यांमधून अरबाज पटेल एलिमिनेट झाला. यामुळे अरबाज आणि निक्की जोडी तुटली. अरबाज घराबाहेर होताना निक्की ढसाढसा रडताना दिसली. मुख्य द्वारपाशी अरबाजचे पाय पकडून निक्की जोरजोरात रडत होती. अरबाज घराबाहेर आल्यामुळे निक्की पूर्णपणे आता खचलेली पाहायला मिळत आहे. अशातच कलर्स मराठीने आजच्या भागाचे काही नवीन प्रोमो शेअर केले आहेत, ज्यात अंकिता, पॅडी हे अरबाजबद्दल बोलत असल्याचे पाहायला मिळत आहे.
‘बिग बॉस’च्या घरात अरबाजने जान्हवी ज्यांच्याबरोबर राहते ते सगळे या घरातून हळहळू बाहेर जात असल्याचे म्हटलं होतं. यावर ‘टीम बी’मधील पॅडी, अभिजीत व “डीपी यांनी वर्षा पण बाहेर जाणार का?” असं मस्करीत म्हटलं. त्यानंतर किचनजवळ हीच गोष्ट अरबाजने जान्हवीला सांगितली आणि यामुळे जान्हवी भावुक झाली होती. याबद्दल जान्हवीने अंकिता, सूरज व पॅडी यांना असं म्हणते की, “तुमच्यात जान्हवी अपशकुनी आहे तिच्याबरोबर राहतात तेच बाहेर जातात अशी काही चर्चा झाली होती का?”
यावर अंकिताला याबद्दल काहीही माहिती नसतं, त्यामुळे ती “नाही” असं उत्तर देते. मग पॅडी असं म्हणतात की, “असं आम्हाला अरबाज येऊन म्हणाला होता. त्याने आम्हाला येऊन असं म्हटलं होतं की, जान्हवी ज्यांच्याबरोबर राहते ते लोक घराच्या बाहेर जातात. वैभव तुझ्याबरोबर होता. तुम्ही दोघे एकत्र होतात, तो गेला. आर्या पण तुझ्याबरोबर होती ते गेली”. जान्हवी असं म्हणते की, “मी आणि वर्षाताई जेवायला बसलो होतो तेव्हा अरबाजने येऊन सांगितले की, वर्षा ताई बघा तुमच्याबद्दल तुमची टीम बाहेर काय बोलते?”
आणखी वाचा – अभिमानास्पद! ९७ व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यासाठी ‘लापता लेडीज’ची निवड, सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव
याबद्दल पुढे अंकिता असं म्हणते की, “जाताना पण बघा कसे किडे करुन गेला आहे तो…” पुढे पॅडी याबद्दल असं म्हणतात की, “आता वर्षाताईंना तुम्ही तुमच्याबरोबर घेतलं आहेत. तर आता त्यांचा नंबर आहे का? असं आम्ही त्याला विचारलं. यानंतर अंकिता पॅडी यांना असं म्हणते की, “तुम्ही ही गोष्ट वर्षाताईंना सांगा”.