टेलिव्हिजन अभिनेत्री दिशा परमार ही सध्या खूप चर्चेत आहे. आजवर ती अनेक हिंदी मालिकांमध्ये दिसून आली. तसेच ‘बिग बॉस’च्या १४ पर्वामध्ये दिसून आली होती. तिच्याबरोबर यामध्ये गायक राहुल वैद्यदेखील सहभागी झाला होता. यावेळी दोघांमध्ये चांगली मैत्री झाली आणि नंतर मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. काही काळ एकमेकांना डेट केल्यानंतर ते लग्नबंधनात अडकले. दिशा व राहुल यांना २०२३ साली कन्यारत्न प्राप्त झाले. तिचे नाव नव्या असे ठेवण्यात आले. नुकताच नव्याचा पहिला वाढदिवस साजरा करण्यात आला. (disha parmar daughter birthday celebration)
दिशा व राहुलने लेकीचा पहिला वाढदिवस धुमधडाक्यात साजरा केला. त्यांनी वाढदिवसाचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. राहुल व दिशाने नव्याच्या वाढदिवसाची बार्बी थीम ठेवली होती. यामध्ये डेकोरेशनपासून केक हे सगळं काही गुलाबी रंगामध्ये होतं. वाढदिवस साजरा करण्याच्या वेळी लाल रंगाचा फ्रॉक घातला होता. तसेच डोक्यावर हेअर बॅंडदेखील लावला असल्याने ती अजूनच यामध्ये ती खूप गोड दिसत होती. तसेच दिशाने गुलाबी रंगाचा ड्रेस घातला असून राहुलने नीळी जीन्स व पांढऱ्या रंगाचा शर्ट परिधान केला होता. नव्याच्या वाढदिवसाला तिच्या दोन्ही आजीदेखील पोज देताना दिसल्या.
राहुलने फोटो शेअर करत लिहिले की, “नवू बाबा, माझ्या पहिल्या राजकुमारीला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा. नव्याला शुभेच्छा देणाऱ्या सगळ्यांचे आभार”. दिशा व राहुलने केलेल्या पोस्टवर सगळ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. दिशानेदेखील सोशल मीडियावर काही व्हिडीओ शेअर केले आहेत. यामध्ये लाडक्या लेकीबरोबर सर्व एंजॉय करताना दिसत आहे. दरम्यान त्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेले दिसून येत आहेत.
दिशा परमार व राहुल वैद्य ‘बिग बॉस’मधील त्यांच्या नात्यामुळे चर्चेत आले होते. त्यानंतर दोघेही एकमेकांना वाचन दिल्याप्रमाणे लग्नबंधनात अडकले. आई-बाबा होणार असल्याची गुडन्यूजही त्यांनी चाहत्यांसह शेअर केली. अखेर दिशाने गोंडस अशा मुलीला जन्म दिला. दिशा व राहुलने ख्रिसमसच औचित्य साधत तिच्या लेकीचा चेहरा दाखवला होता. त्यामुळे चाहत्यांमध्ये आनंदच वातावरण पाहायला मिळत होतं.