मुंबईसारख्या शहरात स्वतःच हक्काचं घर घेण हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. अशी बरीच कलाकार मंडळी आहेत ज्यांचही मुंबईत घर घेण्याचे स्वप्न आहे. मुंबई ही मायानगरी असून विशेषतः सिनेसृष्टीशी निगडित अनेक कलाकार मुंबई स्थायिक असलेले पाहायला मिळतात. त्यामुळेच सततच्या कामानिमित्त अनेक जण मुंबईत नवघर घेताना दिसतात. बॉलीवूड नव्हे तर अनेक मराठी कलाकारांनी मुंबईत स्वतःच हक्काचं नवं घर घेतलं असल्याचे पाहायला मिळालं. अशातच आता आणखी एका मराठमोळ्या कलाकाराची घर घेण्याची इच्छा पूर्ण झाली आहे. (Anshuman Vichare New Video)
घर घेण्याची इच्छा पूर्ण झालेला हा मराठी कलाकार म्हणजेच अंशुमन विचारे. विनोदी अंगाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या अंशुमन विचारेने मुंबईत स्वतःच हक्काचं नवं घर घेतलं असल्याचं दिसलं. काही दिवसांपूर्वी त्याच्या नव्या घराचं बांधकाम चालू असल्याचा व्हिडीओ त्याने सोशल मीडियावरुन शेअर केला होता. यावेळी कन्स्ट्रक्शन साईडला त्याने पत्नीसह भेट दिली होती. “नव घर लवकरच, खूप खूप वाट पाहत आहोत”, असं कॅप्शन देत त्यांनी हा व्हिडीओ शेअर केला होता. आता या पाठोपाठ आणखी एक व्हिडीओ शेअर करत त्यांनी नव्या घरात लवकरच राहायला जाणार असल्याचं सांगितलं आहे.
आणखी वाचा – सुरक्षा रक्षकाला धक्का दिला अन्…; काजोलचा ‘तो’ व्हिडीओ पाहून नेटकरी भडकले, म्हणाले, “इतका गर्विष्ठपणा…”
“घराचं काम पूर्ण होत आलंय, आम्ही वाटच पाहतोय”, असं कॅप्शन देत त्यांनी घरामधील एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अंशुमन आणि त्याची पत्नी पल्लवी दोघही त्यांच्या नव्या घरातील बांधकामाचे काम करुन घेताना दिसत आहेत. घरातील इंटेरिअरचं काम शिल्लक असल्याचं व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. काही दिवसांतच हे काम पूर्ण होऊन अंशुमनचं कुटुंब तिथे राहायला जाणार असल्याचं दिसतंय.
आणखी वाचा – Bigg Boss Marathi : कॅप्टनसीमुळे अरबाज सुरक्षित, आता नक्की घराबाहेर कोण जाणार?, वेगवेगळ्या नावांची चर्चा
अंशुमनने शेअर केलेल्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. “खूपच सुंदर घर आहे. या घरात तुमची उत्तम प्रगती व्हावी आणि तुम्हाला खूप छान छान कामे मिळावी हिच स्वामीच्या चरणी प्रार्थना”, “उभयतांचे मनापासून अभिनंदन”, ” नुतन वास्तुसाठी मनापासून अभिनंदन”, अशा अनेक कमेंट करत त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.