Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात नुकतीच पहिली वाइल्ड कार्ड एन्ट्री झाली. बॉडी बिल्डर संग्राम चौगुलेने ‘बिग बॉस मराठी’च्या वाईल्ड कार्ड म्हणून एन्ट्री घेतली. संग्राम चौगुले घरात शिरताच घरातील समीकरणं बदलतील आणि नवा राडा पाहायला मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, ‘बिग बॉस’च्या घरात एन्ट्री करताच दादागिरी करणारा संग्राम नंतर मात्र दिसेनासाच झाला. वाईल्ड कार्ड सदस्याला ‘बिग बॉस’चा खेळ, त्या खेळातील सदस्यांचा गेम प्लॅन या सर्व गोष्टी माहिती असतात. त्यानुसार वाइल्ड कार्ड सदस्य आपला गेम प्लॅन ठरवत असतो. पण संग्रामचा तसा गेम प्लॅन प्रेक्षकांना पाहायला मिळाला नाही. (Bigg Boss Marathi 5 Utkarsh Shinde)
अशातच नुकत्याच झालेल्या एका टास्कमध्ये संग्राम अरबाजविरुद्ध खेळी करेल आणि टास्क जिंकेल अशी अपेक्षा होती. पण संग्रामने अरबाजबरोबर अगोदरच केलेल्या डीलमुळे त्याने आपला गेम दाखवला नाही. त्यानंतरच्या फेरीत अरबाजबरोबर टास्क खेळताना त्याला दुखापत होते आणि याचा दोष जान्हवी व संग्राम ‘टीम बी’ला देतात. यामुळे पॅडी, अंकिता व अभिजीत यांचे जान्हवी-संग्रामशी जोरदार भांडण होते. यावेळी संग्राम सर्वांना त्याची बाजू समजावून सांगतो. मात्र तो त्याची बाजू समजावून सांगताना सर्वांचाच गोंधळ होतो. यावेळी संग्रामच्या डीलबद्दल अभिजीत, पॅडी त्याला विचारतात तेव्हा संग्राम असं म्हणतो की, “मी टीमचं न ऐकता माझ्या विचारांनी खेळलो” असं म्हटलं.
आणखी वाचा – Bigg Boss Marathi : कॅप्टनसीमुळे अरबाज सुरक्षित, आता नक्की घराबाहेर कोण जाणार?, वेगवेगळ्या नावांची चर्चा
त्यानंतर त्याने आपली बाजू मांडताना अरबाजसमोर टीम वीक होत असल्याचे सांगितले. तेव्हा पॅडी त्याला सांगतात की, “तू ज्या टीमला वीक म्हणत आहेस त्याच टीममध्ये तू पण आहेस म्हणजे तू पण वीक होता का?”. त्यानंतर पुन्हा संग्राम असं म्हणतो की, “आपण सगळेच स्ट्रॉंगच होतो”. त्यावर पुन्हा पॅडी त्याला असं विचारतात की, “ज्या टीममध्ये तू होतास ती टीमही वीक होती का?” यावर संग्राम त्यांना उत्तर देत असं म्हणतो की, “ती टीम कशी वीक असेल?” यावर अभिजीतही त्याला असं म्हणतो की “तुम्ही आत्ताच म्हणालात की ती टीम वीक होती”. यावर संग्राम “तुम्ही मला शब्दांत फिरवू नका” असं उत्तर देतो. यात संग्राम पुरता गोंधळून गेल्याचे पाहायला मिळाले.
संग्रामच्या याच गोंधळावर अभिनेता, गायक, संगीतकार व बिग बॉस मराठीचा माजी स्पर्धक उत्कर्ष शिंदेने भाष्य केलं आहे. उत्कर्षने संग्राम, पॅडी, अभिजीत यांच्या संवादाचा व्हिडीओ इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे आणि यावर त्याने असं म्हटलं आहे की, “डोकं चक्रावून टाकलं भाईने…” तसंच “बिग बॉस मेडिकल रुमचं दार उघडा” असं म्हणत टोमणाही मारला आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या घरातील पहिला वाइल्ड कार्ड सदस्य संग्राम चौगुले टीम बीबरोबर राहून अरबाजला ताकदीमध्ये टक्कर देताना पाहण्याची इच्छा होती. पण, संग्राम दुसरा वैभव निघाल्याची प्रतिक्रिया व्यक्त झाल्या आहेत.