शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Bigg Boss Marathi : “गेम कधी दाखवणार?”, ‘बिग बॉस’च्या घरातील पत्रकार परिषदेत सूरजला थेट प्रश्न, चेहऱ्यावरचा रंगच उडाला अन्…

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
सप्टेंबर 21, 2024 | 9:56 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bigg Boss Marathi 5 press conference

बिग बॉसच्या घरात झाली पत्रकार परिषद

Bigg Boss Marathi 5 :  ‘बिग बॉस मराठी’चे पाचवे पर्व विशेष चर्चेत राहिलेले पाहायला मिळाले. यंदाच्या या पर्वात सर्वच स्पर्धक मंडळींनी तुफान राडे केलेले दिसले. सध्या घरात निक्की तांबोळी, अरबाज पटेल, जान्हवी किल्लेकर, वर्षा उसगांवकर, पॅडी कांबळे, अंकिता वालावलकर, सूरज चव्हाण, धनंजय पोवार, अभिजीत सावंत, संग्राम चौघुले हे स्पर्धक धुमाकूळ घालताना दिसत आहेत. यंदाच्या या पर्वात आठव्या आठवड्यात सलग दुसऱ्यांदा अरबाज पटेल कॅप्टन पदाचा मानकरी ठरला. तर या आठवड्यात वर्षा यांनी टीम या मधून एक्झिट घेतली. एकूणच आयत्या वेळी गेम पलटला असून आता ‘बिग बॉस मराठी’च्या नव्या प्रोमोने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

आज शनिवार असून दर शनिवारी प्रेक्षक मंडळी भाऊच्या धक्क्याची वाट पाहत असतात. त्यामुळे आज भाऊच्या धक्क्यावर काय घडणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे. अशातच आजच्या एपिसोडचा पहिला प्रोमो समोर आला आहे. मात्र या आठवड्यात भाऊचा धक्का नाही तर महाराष्ट्राचा धक्का होणार असून यावेळी स्पर्धक मंडळींना पत्रकारांच्या प्रश्नांना सामोरे जावे लागणार आहे.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : दुसऱ्यांदा कॅप्टन झाला अरबाज पटेल, निक्कीमुळे खेळ पलटला आणि…; प्रेक्षकांची नापसंती, म्हणाले, “खरी कॅप्टन तर…”

View this post on Instagram

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

समोर आलेल्या प्रोमोमध्ये असं पाहायला मिळत आहे की, पत्रकारांनी स्पर्धकांना थेट प्रश्न विचारले आहेत. डीपीला असा प्रश्न विचारण्यात आला की “तुम्हाला अभिजीतचा इश्यू आहे का?”. त्यानंतर अरबाजला त्याच्या व निक्कीच्या नात्यावरुन “शो संपल्यानंतर निक्कीशी नातं तसंच राहणार का?” असा प्रश्न विचारण्यात येतो. तर “जान्हवीला तिच्याकडून काय चुकलं” असं विचारण्यात येतं. तसेच सूरजला “तू गेम कधी दाखवणार”, असा सवाल करण्यात आला. त्यानंतर निक्कीला अरबाजबद्दल प्रश्न केला जातो. “तुला असं वाटतंय का की अरबाज आता घरातून जाईल आणि आता त्यानंतर आपल्याला दुसरा साथीदार पाहिजे” या सर्व प्रश्नांची उत्तरं हे स्पर्धक काय देतात? ते आजच्या एपिसोडमध्ये पाहायला मिळणार आहे.

आणखी वाचा – 21 September Horoscope : मेष, सिंह व कन्या राशीच्या लोकांची व्यवसायात होणार प्रगती, शनिवारचा दिवस नेमका कसा?

दरम्यान, सदर व्हिडीओवर नेटकऱ्यांनी अनेक कमेंट करत प्रश्नांचा भडीमार केला आहे. ‘बिग बॉस मराठी’चा हा प्रोमो पाहून “निक्की-अरबाजला दत्तक घेतलंय का?” असा प्रश्न बिग बॉसला विचारा अशी मागणी प्रेक्षक करत आहेत.

Tags: bigg boss marathiBigg Boss Marathi  Season 5colors marathi
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Deepshikha Ngpal ready to marry after divorce
Entertainment

दोन घटस्फोटानंतर अजूनही तीन ते चारवेळा लग्न करण्याची दीपशिखा नागपालची इच्छा, वयाची ४५शी ओलांडून गेली तरी…

जून 7, 2025 | 1:26 pm
dipika kakar surgery
Entertainment

१४ तास ऑपरेशन, लिव्हरचाही काही भाग कापला अन्…; दीपिका कक्करची कॅन्सरशी झुंज, आता परिस्थिती अशी की…

जून 7, 2025 | 11:59 am
filmmaker Manish Gupta stabbed driver
Entertainment

धक्कादायक! बॉलिवूडच्या सुप्रसिद्ध दिग्दर्शकाचा ड्रायव्हरवर चाकूने हल्ला, जागीच कोसळला अन्…; संपूर्ण घटना समोर

जून 7, 2025 | 11:13 am
Dia Mirza Pregnancy
Women

…अन् गरोदरपणात दिया मिर्झाला झाला नको तो संसर्ग, लेकाच्या जीवावरही बेतलं, ३६ तासांनी शस्त्रक्रिया झाली आणि…

जून 7, 2025 | 10:00 am
Next Post
Arya Jadhav Meet Yogita Chavan

योगिताला भेटण्यासाठी तिच्या घरी पोहोचली आर्या, घट्ट मिठी मारली अन्…; व्हिडीओ तुफान व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.