अभिनेत्री अनीता हंसनंदानी ही नेहमी चर्चेत राहणारी अभिनेत्री आहे.आजवर तिने हिंदी चित्रपट व मालिकांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. तिने आजवर मुख्य भूमिका तसेच खलनायिका म्हणून भूमिका साकारल्या आहेत. अनीता सोशल मीडियावरदेखील अधिक सक्रिय असते. पती, मुलासमवेत ती अनेक फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. आजवर तिचे खासगी आयुष्यदेखील खूप चर्चेत राहिले आहे. तिचे प्रेमसंबंधदेखील खूप चर्चेत राहिले आहेत. आता पुन्हा एकदा अफेअरबद्दल चर्चा करताना दिसत आहे. तिने मुलाखतीमध्येही याबद्दल खुलासे केले आहेत. (anita hansnandani on eijaz khan)
तिने एका मुलाखतीमध्ये एका अभिनेत्यासाठी स्वतःला बदलले असल्याचेदेखील सांगितले. या सगळ्याचा तिला आजही पश्चाताप असल्याचे ती म्हणते. अनीताने नुकतीच ‘हाऊटरफ्लाय’ला मुलाखत दिली. यामध्ये ती एक्स बॉयफ्रेंड एजाज खानबद्दल भाष्य केले आहे. तिने सांगितले की, “माझ्या आयुष्यातील एक दीर्घकाळ असलेले नातं होतं. या नात्यामुळे मी माझ्या आईच्या देखील विरोधात गेले होते. आमची संस्कृती खूप वेगळी होती. तो मुसलमान होता आणि मी हिंदू. माझ्या आईने नकार दिला. मी व एजाज एकमेकांबरोबर खूप चांगले होतो पण एकमेकांसाठी योग्य नव्हतो. पण शेवटी हे नातं चाललं.
तसेच ती पुढे म्हणाली की, “कोणी तुमच्यावर प्रेम करत असेल पण जर तुम्हाला बदलत असेल तर ते प्रेम नसतं. पण मला तेव्हा काही वाटलं नाही. मी त्याच्या प्रेमात आकंठ बुडाले होते. मी त्या व्यक्तीसाठी स्वतःला बदलायला तयार होते. पण मी जर बदलले असते तर एक वेगळी व्यक्ती असते. मला यातून बाहेर पडण्यासाठी एका वर्षापेक्षा अधिक काळ लागला”.
तसेच या सगळ्यामधून काय शिकायला मिळालं? असं विचारल्यावर तिने सांगितले की, “सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे जी व्यक्ती तुम्हाला बदलत असेल तर अशा व्यक्तीबरोबर कधीही राहू नये. वेळोवेळी त्यांचा फोन तपासा. तो जर फोन लपवत असेल तर काहीतरी गडबड आहे असं समजून जावं. तसेच तुमचे कुटुंब किंवा मित्रांपासून लांब व्हायला सांगत असेल तर काळजी घ्या”. दरम्यान अनीता ‘ये है मोहोब्बते या मालिकेमुळे अधिक लोकप्रिय झाली. तिच्या अभिनयालादेखील खूप पसंती मिळाली होती.