Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या घरातील खेळ आता रंगत चालला आहे असं दिसून येत आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या घरामधील सर्व सदस्य टास्कमध्ये आपलं शंभर टक्के योगदान देताना दिसत आहेत. ‘बिग बॉस मराठी ५’ सुरु होऊन आता ५० दिवसांपेक्षा जास्त काळ लोटला आहे. अशातचं नुकताच घरामध्ये कॅप्टनसीच्या उमेदवारीसाठी टास्क सुरु झाला आहे. टास्कमध्ये कॅप्टन पदाची उमेदवारी मिळवण्यासाठी दुसऱ्या सदस्यांच्या घरट्यात अंड ठेऊन नको असलेल्या सदस्याला बाद करायचं होतं. पहिल्या फेरीत ‘ए टीम’कडून निक्की-अरबाज तर, ‘बी टीम’कडून जान्हवी-संग्राम खेळण्यासाठी जातात. या टास्कमध्ये अरबाज अगदी सहजपणे जान्हवी व संग्रामला अडवतो आणि यामुळे निक्की अंडी उचलून अंकिता आणि पंढरीनाथ यांच्या घरट्यात टाकते. यामुळे हे दोघंही कॅप्टन्सी कार्यातून बाद होतात. (Bigg Boss Marathi 5 New Promo)
या टास्कपूर्वी अरबाजने संग्रामबरोबर डील केली होती. यामुळे पहिल्या फेरीत ‘ए टीम’ला विजय मिळवणं अगदी सहज शक्य झालं. ठरल्याप्रमाणे निक्कीला, अंकिता व अभिजीतच्या घरट्यात अंडी टाकून त्यांना कॅप्टन्सी कार्यातून बाद करायचं होतं. पण, ऐनवेळी निक्कीने पलटी मारली. त्यांच्या या डीलबद्दल आता डीपी यांना माहित झाले असून याबद्दल ते वर्षा यांना सांगत आहेत, मात्र काही कारणामुळे वर्षा व डीपी यांच्यात बाचाबाची होणार आहे. त्यांच्या या बाचाबाचीचा नवीन प्रोमो नुकताच शेअर करण्यात आला आहे.
कलर्स मराठीच्या सोशल मीडिया अकाऊंटद्वारे शेअर करण्यात आलेल्या या प्रोमोमध्ये डीपी व वर्षा यांच्यात भांडण होत असल्याचे पाहायला मिळत आहे. या प्रोमोमध्ये डीपी वर्षा यांना असं म्हणतात की, “पहिल्या फेरीत संग्राम, जान्हवी व अरबाज यांच्यात डील झाली होती की, हे मी तुम्हाला सांगितलं होतं”. यावर वर्षा “नाही” असं म्हणतात. त्यानंतर धनंजय मांडी ठोकत “मी सर्वांच्या तोंडावर बोलतो” असं बोलतात. पुढे वर्षा त्यांना “ओरडू नका” असं म्हणतात. यावर धनंजय वर्षा यांना “तुम्ही ओरडायला भाग पाडता कारण तुमच्यात ऐकून घेण्याची क्षमता नाही” असं म्हणत उत्तर देतो.
मग पुढे वर्षा डीपी यांना “तू तोंडावर पडला आहेस” असं म्हणतात. यावर धनंजय “मी तोंडावर पडत नाही. मी शड्डू ठोकून उभा राहतो” असं उत्तर देतात. डीपी व वर्षा यांचा हा नवीन प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल होत असून अनेकांनी डीपीलाअ पाठींबा दिला आहे. दरम्यान गेले काही दिवस वर्षा व डीपी यांच्यात काही कारणावरुन छोटे मोठे वाद होतानाचे पाहायला मिळाले होते. अशातच आता त्यांच्यात मोठे भांडण होणार असल्याचे पाहायला मिळणार आहे.