बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन सध्या खूप चर्चेत आहे. काही महिन्यांपासून ऐश्वर्या अभिषेक बच्चनपासून वेगळी होणार असल्याची चर्चा सर्वत्र रंगली होती. अभिषेकने साखरपुड्याची रिंग दाखवत अजूनही विवाहित असल्याची पोस्ट त्याने सोशल मीडियावर केली होती. तसेच त्यानंतर ती दुबईमध्ये अभिषेक व आराध्यासह दिसून आली होती. त्यामुळे त्यांच्यामध्ये सर्व व्यवस्थित सुरु असल्याचेदेखील स्पष्ट झाले होते. अशातच आता ऐश्वर्या यांचा एक नवीन व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये माय-लेकींमधील प्रेम दिसून येत आहे. (aishwarya rai and aaradhya bachchan viral video)
आराध्याचा जन्म झाल्यापासून ती नेहमीच आईबरोबर दिसून आली आहे. अवॉर्ड शो, रेड कार्पेट, कार्यक्रम अशा ठिकाणी त्या बरोबर असलेल्याच दिसून येतात. आराध्या नेहमी तिच्या आईचा आत्मविश्वास वाढवताना दिसते. याबाबतचा नुकताच एक व्हिडीओ समोर आला आहे. ऐश्वर्याने SIIMA 2024 पुरस्कार सोहळ्यासाठी उपस्थित राहिली होती. यावेळी तिला ‘पोन्नियन सेलवान’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. यावेळी जेव्हा विक्रम चियान व ऐश्वर्या मंचावरुन खाली उतरत होते तेव्हा आराध्या आईकडे धावत आली आणि मिठी मारली.
त्याचवेळी तिथे कन्नड सुपरस्टार शिवा राजकुमारदेखील उपस्थित होते. तेव्हा तिची भेट त्यांच्याबरोबर झाली. यावेळी आराध्याने हात जोडून शिवा यांना नमस्कार केलं आणि त्यांच्या पाया पडून आशीर्वाददेखील घेतले. तिच्या या कृतीने सगळ्यांचेच लक्ष वेधले असून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला आहे.
हा पुरस्कार सोहळा १४ सप्टेंबर रोजी दुबई येथे पार पडला. यासाठी ऐश्वर्याला पुरस्कारदेखील मिळाला. पुरस्कार घेण्यासाठी ती मंचावर गेली असता आराध्याने पुरस्कार घेतानाचा क्षण मोबाइल कॅमेरामध्ये कैद केला. मणिरत्नम दिग्दर्शित ‘पोन्नियन सेलवान’च्या पहिल्या व दुसऱ्या भागात ऐश्वर्या दिसून आली होती. यामध्ये तिची वेशभूषा, केशभूषा तसेच तिच्या सौंदर्याने सगळ्यांचेच लक्ष वेधले होते. दरम्यान सध्या ऐश्वर्या नवीन चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिकांमध्ये दिसून येऊ शकते असा अंदाज व्यक्त केला जात आहे.