सध्या ‘पारू’ ही मालिका खूप चर्चेत असलेली पहायला मिळत आहे. या मालिकेला अल्पावधीतच प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळालं आहे. सध्या ही मालिका तिच्या कथानकामुळे गाजत आहे. या मालिकेतील पात्रांवरही प्रेक्षक प्रेम करताना दिसत आहेत. विशेषतः या मालिकेतील अहिल्यादेवी या पात्राने साऱ्यांची मनं जिंकली आहेत. अहिल्यादेवी या पात्राचं मालिकेत महत्त्वाचं स्थान असलेलं पाहायला मिळत आहे. सर्वाधिक वजनदार अशी भूमिका या मालिकेत अहिल्यादेवी किर्लोस्कर यांची आहे. अहिल्यादेवी किर्लोस्कर बोलतील तो शेवटचा शब्द असतो. त्यांच्या शब्दाबाहेर कोणतीच गोष्ट होत नसल्याने अहिल्यादेवी यांची मुख्य अशी भूमिका मालिकेत दाखविण्यात आली आहे. (mugdha karnik emotional post)
अहिल्यादेवी ही भूमिका अभिनेत्री मुग्धा कर्णिक साकारत आहे. करारी नजर, कठोर स्वभाव, ही अहिल्यादेवी यांच्या स्वभावाची वैशिष्ट्य आहेत, असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. मुग्धा कर्णिक हिने अहिल्यादेवी या पात्रातून प्रेक्षकांच्या मनात यशस्वी अशी छाप उमटवली आहे. सोशल मीडियावर देखील मुग्धा अधिक प्रमाणात सक्रिय असलेली पाहायला मिळते. खासगी आयुष्यातील अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करताना दिसते.
नुकताच तिने एक फोटो शेअर केला आहे. ज्याकडे सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. तिने वडिलांबरोबरचा एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये ती वडिलांच्या आठवणीमध्ये भावुक झालेली दिसून येत आहे. तिने वडिलांचा फोटो शेअर करत लिहिले की, “बाबा, अशी कशी विसरले मी? विसरुच कशी शकले? खरतर मी तुला विसरण्यापेक्षा हा दिवस विसरले. एखाद्याची आठवण काढण्यासाठी त्याला विसरावं लागतं. पण असा एकही दिवस नसतो जेव्हा माझ्या मनात तुझा विचार येत नाही. मी जे काही करते, मिळवते, माझं लहानातलं लहान यश आणि माझी मोठ्यातली मोठी मिळकत तुझ्याशिवाय अपूर्णच वाटणार”.
पुढे तिने लिहिले की, “हे सगळं मिळवताना तुला माझा किती अभिमान वाटला असता? किती आनंद झाला असता? याचा विचार करुन मन शांत करते आणि आयुष्य पुढे असच चालू राहणार, आय मिस यु”. दरम्यान या पोस्टकडे सगळ्यांचेच लक्ष वेधले आहे.