Durga Khote : प्रत्येकाच्या आयुष्यात चढ-उतार हे येतच असतात आणि आपल्या कुणालाच भविष्यात काय होणार आहे हे माहीत नसते. प्रत्येकाचे जीवण हे संघर्षमे असते. प्रत्येक व्यक्तीची स्वतःची अशी एक संघर्षकथा असते परंतु काही कथा हृदयाला हेलावून टाकतात. अशीच मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलेल्या अभिनेत्रीची कथा आहे, एकेकाळी त्यांनी चित्रपटसृष्टी गाजवली पण त्यांचे जीवन हे खूपच संघर्षमय होतं आणि या अभिनेत्री म्हणजे दुर्गा खोटे. पाच दशकं आपल्या दमदार अभिनयाने सिनेसृष्टीवर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री दुर्गा खोटे हे नाव कोणाला माहीत नसेल असं होणार नाही. ज्या काळात स्त्रियांच्या भूमिकाही पुरुषच बजावत असत, त्या काळात दुर्गा खोटे यांनी चित्रपटांत प्रवेश केला आणि नायिका म्हणून आपला ठसा उमटवला. (Durga Khote Struggle Story)
दुर्गा खोटे यांनी ३१ मध्ये ‘फरेबी जलाल’ या मूकपटात पहिल्यांदा काम केलं होतं. यानंतर त्यांनी ‘विधुर’, ‘अमर ज्योती’ आणि ‘वीर कुणाल’ यांसारख्या चित्रपटांत काम केलं. दुर्गा खोटे यांनी मुख्य अभिनेत्रीपासून आईपर्यंतच्या भूमिका केल्या. मात्र, त्यांचा प्रवास सोपा कधीच नव्हता. दुर्गा खोटे या चांगल्या आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम कुटुंबातील होत्या. ज्या काळात महिलांना घराबाहेर पडण्याची परवानगी नव्हती, त्यावेळी दुर्गा खोटे यांनी मुंबईच्या सेंट झेवियर्स कॉलेजमधून पदवी प्राप्त केली. दुर्गा खोटे यांचे वयाच्या १७व्या वर्षी लग्न झाले. पण त्यांचा हा आनंद अल्पकाळ टिकला. दुर्गा खोटे यांचे वयाच्या १७ व्या वर्षी लग्न झाले. पण त्यांचा हा आनंद अल्पकाळ टिकला. त्या २६ वर्षांच्या असताना त्यांच्या पतीचे निधन झाले आणि त्यानंतर त्या एकट्याच राहिल्या.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : संग्रामला घराबाहेर काढण्याचा निक्कीचा प्लॅन, म्हणाली, “जान्हवीशी बोलत नाही पण…”
दुर्गा यांना बकुल आणि हरीन ही दोन मुले झाली. पतीच्या निधनानंतर घर चालवण्यासाठी दुर्गा खोटे यांनी मुलांना शिकवणी देण्यास सुरुवात केली. दोन्ही मुले चांगली स्थिरावली. यानंतर दुर्गा यांनी दुसरं लग्न केलं, पण ते लग्नही फार काळ टिकलं नाही. त्यादरम्यान त्यांचा लहान मुलगा हरिन मरण पावला. या दु:खात त्या कोलमडल्या. हिंदी आणि मराठीशिवाय दुर्गा यांनी बंगाली चित्रपटांमध्येही काम केलं. पतीच्या निधनानंतर त्यांना अनेक आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागले. या कठीण प्रसंगातून मार्ग काढण्यासाठीच त्या चित्रपटांकडे वळल्या.
५० वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी २०० हून अधिक सिनेमे केले. दुर्गा खोटे यांनी सिनेनिर्मितीतही हात आजमावला. त्यांचे ‘मुगल-ए-आझम’, ‘अमर ज्योती’, ‘बिदाई’, बॉबी’, ‘खिलोना’, ‘खुशबू’ आणि ‘कर्ज’ सारखे चित्रपट खूपच गाजले. सिनेसृष्टीतील अतुलनीय योगदानाबद्दल त्यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. याशिवाय त्यांना पद्मश्री पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले. दुर्गा खोटे यांचे २२ सप्टेंबर १९९१ रोजी वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झाले.