बॉलिवूडला सुपरहिट चित्रपट देणारी अभिनेत्री राणी मुखर्जी सध्या रुपेरी पडद्यापासून दूर आहे. राणी बऱ्याचदा लाइमलाइटपासूनही दूर राहण्याचा प्रयत्न करते. शिवाय खासगी आयुष्याबाबत बोलणंही ती टाळते. मात्र आता बऱ्याच वर्षांनी राणीने तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबत मोठा खुलासा केला आहे. जन्मानंतर राणीची रुग्णालयात दुसऱ्या कुटुंबाबरोबर आदलाबदल झाली होती आणि याबद्दल खुद्द राणीने ‘एबीपी न्यूज’ला दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केला होता. बॉलीवूडची लोकप्रिय अभिनेत्री राणी मुखर्जी तिच्या उत्कृष्ट अभिनयामुळे खूप चर्चेत असते. राणी मुखर्जीने बॉलिवूडमध्ये अनेक उत्कृष्ट चित्रपट दिले आहेत. स्वत:च्या हिमतीवरही चित्रपट हिट करण्याची क्षमता या अभिनेत्रीमध्ये आहे. अशातच अभिनेत्री तिच्या जन्माबद्दलच्या किस्स्यामुळे चर्चेत आली. (Rani Mukherjee Exchanged News)
‘एबीपी न्यूज’शी संवाद साधताना या घटनेबद्दल बोलताना राणी मुखर्जी एकदा म्हणाली होती की, “जेव्हा माझा जन्म झाला तेव्हा मी एका पंजाबी कुटुंबाच्या खोलीत अडकले होते. मग माझी आई मला तिथून घेऊन आली, खरं तर, ही एक अतिशय मनोरंजक गोष्ट आहे की, माझी हॉस्पिटलमध्ये अदलाबदल झाली होती. जेव्हा माझ्या आईने ते दुसरे मूल पाहिले तेव्हा ती म्हणाली की हे माझे मूल नाही”. पुढे राणी म्हणाली की, “माझ्या आईने माझा शोध सुरू केला तेव्हा तिला एक पंजाबी कुटुंब सापडले, ज्यांना आठव्यांदा मुलगी झाली होती आणि मी तिथे होती. आताही लोक अनेकदा विनोद करतात की तू पंजाबी आहेस. माझ्या चुकीमुळे तू माझ्या कुटुंबात आली आहेस”.
राणीच्या घरात सुरुवातीपासूनच फिल्मी वातावरण होते. कारण त्यांचे वडील राम मुखर्जी दिग्दर्शक होते. राणीचे वडील राम मुखर्जी चित्रपट निर्माते होते, तर तिची आई कृष्णा मुखर्जी पार्श्वगायिका होत्या. राणीचा जन्म २१ मार्च १९७८ रोजी मुंबईत कृष्णा मुखर्जी आणि राम मुखर्जी यांच्या घरी झाला. राणीनं तिच्या वडिलांच्या बियेर फूल या बंगाली सिनेमात काम केलं होतं. त्यानंतर राणीनं बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली. राजा की आएगी बारात हा राणी मुखर्जी हिचा बॉलिवूडमधला पहिला सिनेमा. या सिनेमात काम केलं तेव्हा राणी अवघी १६ वर्षांची होती.
दरम्यान, राणी मुखर्जीनं मोठा ब्रेक घेतल्यानंतर आता पुन्हा एकदा चित्रपटांतून काम करायला सुरुवात केली आहे. राणीला फॅशन डिझायनर म्हणून काम करण्याची इच्छा होती. पण वडिलांच्या इच्छेमुळं तिनं अभिनयाच्या क्षेत्रात पाऊल टाकलं. ४६ वर्षीय राणी मुखर्जीच्या वैयक्तिक आयुष्याविषयी सांगायचे तर, राणीने प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक आदित्य चोप्रासोबत लग्न केले. आदित्य आणि राणीचे लग्न २०१४ साली झाले होते. या जोडप्याच्या लग्नाला १० वर्षे झाली आहेत, आता राणी आणि आदित्य हे आदिरा चोप्रा नावाच्या मुलांचे पालक आहेत.