शनिवार, एप्रिल 18, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Bigg Boss Marathi : संग्रामला घराबाहेर काढण्याचा निक्कीचा प्लॅन, म्हणाली, “जान्हवीशी बोलत नाही पण…”

Saurabh Moreby Saurabh More
सप्टेंबर 20, 2024 | 4:44 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bigg Boss Marathi 5 daily updates Nikki Tamboli plan to Sangram Chougule out of the house and she told DP about that

Bigg Boss Marathi 5 च्या घरातून संग्रामला बाहेर काढण्याचा निक्कीचा प्लॅन, डीपीसमोर व्यक्त केला राग

Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात नुकतीच सीझनची पहिली वाइल्ड कार्ड एन्ट्री झाली. बॉडी बिल्डर संग्राम चौगुले ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वामधील पहिला वाईल्ड कार्ड स्पर्धक ठरला. संग्राम चौगुले घरात शिरताच घरातील समीकरणं बदलतील आणि नवा राडा पाहायला मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, ‘बिग बॉस’च्या घरात एन्ट्री करताच दादागिरी करणारा संग्राम नंतर मात्र दिसेनासाच झाला. वाईल्ड कार्ड सदस्याला ‘बिग बॉस’चा खेळ, त्या खेळातील सदस्यांचा गेम प्लॅन या सर्व गोष्टी माहिती असतात. त्यानुसार वाइल्ड कार्ड सदस्य आपला गेम प्लॅन ठरवत असतो. पण संग्रामचा गेम प्लॅन प्रेक्षकांना पाहायला मिळाला नाही. (Bigg Boss Marathi 5 Daily Updates)

याबद्दल गेल्या आठवड्याच्या भाऊच्या धक्क्यावर रितेशने संग्राम चौगुलेची शाळाही घेतली. तुम्ही वाइल्ड कार्ड म्हणून नाही तर माइल्ड कार्ड आहात असं म्हणत रितेशने संग्रामचे कान टोचले. त्यानंतर संग्रामने सोमवारच्या टास्कमध्ये त्याचा थोडा खेळ दाखवण्याचा प्रयत्न केला. सोमवारी झालेल्या ‘जंगलराज’ या नॉमिनेशन टास्कमध्ये त्याने बंदूक हिसकावत सूरजला हरवले व त्यामुळे ‘टीम ए’ थेट नॉमिनेट झाली. संग्राम व सूरज यांच्या टास्कमध्ये संग्रामने सूरजकडून बंदूक खेचून घेतली. त्यामुळे निक्की, अरबाज, जान्हवी, सूरज व वर्षा यांची टीम थेट नॉमिनेट झाली. याचाच राग मनात ठेवत निक्कीने आता संग्रामला घराबाहेर काढण्याची भाषा केली आहे. ‘बिग बॉस मराठी’चा एक नवीन व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

View this post on Instagram

A post shared by Majja (@its.majja)

आणखी वाचा – ‘या’ सुप्रसिद्ध अभिनेत्रीची जन्मानंतर हॉस्पिटलमध्ये झाली होती अदलाबदल, नेमकं काय झालं होतं?, जाणून घ्या रंजक किस्सा

या व्हिडीओत निक्की संग्रामला घराबाहेर काढणार असल्याचे म्हणत आहे. यावेळी ती संग्रामबद्दल डीपीला असं म्हणते की, “या घरात पहिल्या दिवसापासून आपण सगळे आहोत. पण हे (संग्राम) नव्हते. हे आत्ता आले आहेत. त्यामुळे माझ्या मनात यांना बाहेर काढायचाच विचार आहे. सॉरी पण हे माझं मत आहे. कारण या घरात पहिल्या दिवसापासून जशी आहे तशी आहे. आम्ही या घरात गेले ५० दिवस आहोत. त्यामुळे तुम्ही येऊन या घरात तुमचं नवीन साम्राज्य बनवू शकत नाही आणि हे मी तरी बनवू देणार नाही. त्यामुळे मी ठाम आहे की, आमच्या टीमपैकी कुणी या घराबाहेर जावं. मला खूप दु:ख होईल. मी जान्हवीबरोबर बोलत नसली तरी मला दु:ख होईल”.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : “मी कोणत्याही टीमचा नाही”, डीपीचा ‘टीम बी’ला रामराम?, राग व्यक्त करत म्हणाला, “अभिजीत व अंकितामुळे…”

दरम्यान, सोमवारच्या ‘जंगलराज’ टास्कमध्ये शेवटच्या फेरीत संग्रामने सूरजकडची बंदूक खेचून घेत त्याला नॉमिनेट केले आणि ‘टीम ए’चा ‘टीम बी’विरुद्धचा प्लॅन फिस्कटला. त्यामुळे आता या आठवड्यात घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेसाठी सूरज, अरबाज, निक्की, जान्हवी व वर्षा असे एकूण आच सदस्य थेट नॉमिनेट झाले आहेत. त्यामुळे या आठडव्यात या घरातील कुणाचा प्रवास संपणार हे शेवटच्या दिवशी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.       

Tags: bigg boss marathi 5nikki tambolisangram chougule
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Humidity Infections Summer health issues
Lifestyle

आजकाल तुम्हालाही ताप आणि पोटदुखीचा त्रास होतोय का?, असे होण्यामागचं कारण आहे…

एप्रिल 18, 2026 | 9:50 am
patralekhaa body shamed
Entertainment

मुलाला जन्म दिला, दोन चित्रपटांची निर्मिती आणि…; बॉडी शेमिंग करताच भडकली अभिनेत्री, म्हणाली, “माझे वजन…”

एप्रिल 17, 2026 | 5:11 pm
Jubin Nautiyal is now Married
Entertainment

सुप्रसिद्ध गायकाने गुपचूप बांधली लग्नगाठ, मूळ गावी पारंपरिक पद्धतीने केलं लग्न, पत्नी आहे…

एप्रिल 17, 2026 | 2:10 pm
 bollywood bodyguards salary
Entertainment

सेलिब्रिटी त्यांच्या बॉडीगार्डला लाखो रुपये देतात का?, शाहरुख खानच्या Ex Bodyguard चा खुलासा, म्हणाला, “पगारसुद्धा…”

एप्रिल 17, 2026 | 12:55 pm
Next Post
18 september 2024 Wednesday daily horoscope Marathi news bhavishyavani astrology 12 zodiac sign know more

18 September Horoscope : बुधवारचा दिवस ‘या’ राशींच्या लोकांसाठी शुभ असणार, संपत्ती वाढणार आणि होणार आर्थिक भरभराट

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.