शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘साडे माडे ३’च्या दुसऱ्या भागाच्या चित्रीकरणाला सुरुवात, रिंकू राजगुरुचीही एन्ट्री, काय असणार नवीन?

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
सप्टेंबर 16, 2024 | 1:52 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Sade Made Teen Marathi Movie Part 2

'पुन्हा एकदा साडे माडे तीन' चित्रपट लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला

१७ वर्षांपूर्वी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणाऱ्या साडे माडे तीन या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. या चित्रपटात अशोक सराफ, भरत जाधव, मकरंद अनासपुरे या त्रिकूटाने साकारलेले ‘कुरळे ब्रदर्स’ हे पात्र प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर उचलून घेतले. हिंदी चित्रपटसृष्टीतील गाजलेल्या ‘चलती का नाम गाडी’ या अशोक कुमार, अनुप कुमार आणि किशोर कुमार या रील आणि रियल लाइफ भावंडांच्या अभिनयातून लोकप्रियतेस आलेल्या चित्रपटाचा ‘साडे माडे तीन’ हा रिमेक होता. आता चित्रपटरसिकांना ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ च्या निमित्तानं ‘कुरळे ब्रदर्स’चं धूमशान अनुभवायला मिळणार आहे. (Sade Made Teen Marathi Movie Part 2)

काही दिवसांपूर्वीच ‘साडे माडे तीन’ चित्रपटाचा सिक्वेल येणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. यानंतर आता चित्रपटाच्या सिक्वेलच्या शुटींगलाही सुरुवात झाली असल्याचं समोर आलं आहे. ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ मध्ये अशोक सराफ, भरत जाधव, मकरंद अनासपुरे, सिद्धार्थ जाधव हे कलाकार प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. याशिवाय चित्रपटात कोणते कलाकार कोणत्या भूमिकेत दिसणार हे अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आले आहे.

आणखी वाचा – Aditi Rao Hydari And Siddharth Wedding : लग्नबंधनात अडकली अदिती राव हैदरी, सिद्धार्थसह गुपचूप उरकलं लग्न, साऊथ इंडियन लूकमध्ये नटली नवरी

View this post on Instagram

A post shared by Siddharth jadhav (@siddharth23oct)

अभिनेता सिद्धार्थ जाधवने एक पोस्ट शेअर करत ‘साडे माडे तीन’ चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली असल्याचं सांगितलं आहे. शेअर केलेल्या फोटोमध्ये अभिनेता संकेत पाठक, रिंकु राजगुरुही दिसत आहेत. त्याचप्रमाणे या फोटोमध्ये मकरंद अनासपुरे, भरत जाधव, अशोक सराफ ही मंडळी देखील दिसत आहेत. साडे माडे तिने या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी अभिनेता अंकुश चौधरीने साकारली होती. या चित्रपटातून अंकुशने अभिनयक्षेत्रात पदार्पण केलं. आता चित्रपटाच्या सिक्वेलच्या दिग्दर्शनाची जबाबदारीही अंकुश सांभाळताना दिसत आहे. तर चित्रपटाच्या छायाचित्रणाची जबाबदारी संजय जाधव साकारत आहे.

आणखी वाचा – पहिल्यांदा लेकीसाठी व्यक्त झाले वडील, अंकिता व्हिडीओ पाहून ढसाढसा रडली, म्हणाले, “बोलून दाखवलं नाही पण…”

सिद्धार्थने ही पोस्ट शेअर करत म्हटलं की, “पुन्हा एकदा साडे माडे ३”. “पुन्हा एकदा” महाराष्ट्रातल्या ” MEGA SUPERSTARS”बरोबर काम करायचा योग. “पुन्हा एकदा” जुन्या मित्रांबरोबर नविन काम. “पुन्हा एकदा” संजय जाधव सरांच्या नजरेतून दिसण्याच्या योग. “पुन्हा एकदा” अंकुश चौधरी सरांच्या दिग्दर्शनाखाली काम करण्याची संधी आणि “पुन्हा एकदा” मायबाप रसिकांना आनंद देण्याचा घेतलेला वसा”, असं कॅप्शन देत त्याने नव्या चित्रपटाची घोषणा केली.

Tags: new marathi movieSade Made Teen Marathi MovieSade Made Teen Marathi Movie Part 2
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Deepshikha Ngpal ready to marry after divorce
Entertainment

दोन घटस्फोटानंतर अजूनही तीन ते चारवेळा लग्न करण्याची दीपशिखा नागपालची इच्छा, वयाची ४५शी ओलांडून गेली तरी…

जून 7, 2025 | 1:26 pm
dipika kakar surgery
Entertainment

१४ तास ऑपरेशन, लिव्हरचाही काही भाग कापला अन्…; दीपिका कक्करची कॅन्सरशी झुंज, आता परिस्थिती अशी की…

जून 7, 2025 | 11:59 am
filmmaker Manish Gupta stabbed driver
Entertainment

धक्कादायक! बॉलिवूडच्या सुप्रसिद्ध दिग्दर्शकाचा ड्रायव्हरवर चाकूने हल्ला, जागीच कोसळला अन्…; संपूर्ण घटना समोर

जून 7, 2025 | 11:13 am
Dia Mirza Pregnancy
Women

…अन् गरोदरपणात दिया मिर्झाला झाला नको तो संसर्ग, लेकाच्या जीवावरही बेतलं, ३६ तासांनी शस्त्रक्रिया झाली आणि…

जून 7, 2025 | 10:00 am
Next Post
Aishwarya Rai Bachchan Daughter Video

Video : रेड कार्पेटवर ऐश्वर्या राय व लेक आराध्याने एकमेकींना केलं किस, बच्चन कुटुंबिय मात्र दोघींपासून दूर, नेटकरी म्हणाले, “मायलेकी…”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.