सध्या सर्वत्र गणेशोत्सवाची धामधूम सुरु असून भक्तिमय वातावरण पाहायला मिळत आहे. मुंबई-पुण्यातील काही नामांकित मंडळांमध्ये दर्शनासाठी मोठ्या संख्येने हजेरी लावताना दिसतात. अशातच मुंबईत प्रशस्त व नावाजलेल्या लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी भाविक दुरुन येत रात्रं-दिवस लाईनमध्ये उभे राहताना दिसतात. इतकेच नव्हे तर कलाकार मंडळीही या ठिकाणी दर्शनासाठी येतात. दरम्यान, भाविकांचा जनशाच्या दर्शनासाठीचा प्रचंड उत्साह हा अनेकदा गालबोट लागणार ठरु शकतो. आणि हे अगदीच खरं आहे. कारण सध्या लालबागच्या राजाच्या मंडळातील एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. (sharmila shinde on Shocking Video of Lalbaugcha Raja Darshan)
दर्शनासाठी गेलेल्या भक्तांना चुकीची वागणूक देत त्यांच्याबरोबर गैरवर्तन करणं, धक्काबुक्की करणं हे अतिशय निंदनीय असून अशी घटना गणरायाच्या आवारात घडताना दिसली. बरं सर्वसामान्यांना याचा नेहमीच सामना करावा लागला आहे पण आता यात कलाकार मंडळीही भरडू लागले आहेत. नुकताच दर्शनावेळीचा वाईट अनुभव एका लोकप्रिय हिंदी टेलिव्हिजन अभिनेत्रीने शेअर केला. ‘पंड्या स्टोअर’ फेम अभिनेत्री सिमरन बुधरूप हिला लालबागच्या राजाच्या दर्शनावेळी आलेला वाईट अनुभव थेट व्हिडीओ पोस्ट करत शेअर केला.
सदर धक्काबुक्कीचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालेला पाहायला मिळाला. आता या व्हिडीओवर एका मराठमोळ्या अभिनेत्रीनेही मौन सोडलं असल्याचं पाहायला मिळत आहे. ही अभिनेत्री म्हणजे नवरी मिळे हिटलरला फेम अभिनेत्री शर्मिला शिंदे. शर्मिला शिंदेने याआधी ही अनेक न पटलेल्या मुद्द्यांवर भाष्य केलेलं पाहायला मिळालं. आता लालबागच्या राजाच्या दर्शनावेळी वाईट अनुभवाचा व्हिडीओ व्हायरल होताच शर्मिलाने पोस्ट शेअर करत नाराजी व्यक्त केली आहे.
शर्मिला पोस्ट शेअर करत म्हणाली, “मी लहान होते तेव्हा आमची आई आम्हाला खूप कष्टाने मानाच्या गणपतींचं दर्शन घडवायची. आम्ही सुद्धा गर्दीत चेंगरत चेंगरतच दर्शन घ्यायचो. पण, आता मी एक कलाकार आहे. मला फार प्रेमाने आणि आदराने मंडळं आरतीसाठी आमंत्रित करतात म्हणून मी जाते. इतरांनी ज्या मंडळांमधे योग्य वागणूक दिली जात नाही तिथे जाणं टाळा. देव सर्वत्र आहे. घरी बसून नमस्कार करा. आपला माणुसकीचा कोटा उच्च ठेवा. आपल्या आई वडिलांची काळजी घ्या. त्यांची म्हातारपणी सेवा करा. माणसांसाठी आणि इतर प्राणिमात्रांसाठी मनात दया-माया असुद्या. दुसऱ्यांच्या लेकरांना स्वतःच्या लेकरांप्रमाणे प्रेमाने वागवा. बास. यापेक्षा मोठी भक्ती काय असेल. गणपती बाप्पा मोरया. तळटीप : जी मंडळं भाविकांना नीट वागवतात तिथे भाविकांनी सुद्धा सहकार्य करावे”.