‘बिग बॉस मराठी’च्या नव्या पर्वातील भाऊच्या धक्क्याची सगळेजण आतुरतेने वाट पाहत असतात. हा भाऊचा धक्का अभिनेता रितेश देशमुख होस्ट करताना दिसतोय. भाऊच्या धक्क्यावर स्पर्धकांची घेतली जाणारी शाळा हे पाहणं प्रेक्षकांना रंजक ठरतं. आठवड्याभरात स्पर्धकांकडून झालेल्या चुकांचा पाढा वाचत रितेश देशमुख त्यांची चांगलीच कान उघडणी करतो. त्यामुळे सगळेजण या भाऊच्या धक्क्याची आतुरतेने वाट पाहत असतात. अशातच सातव्या आठवड्याच्या या भाऊच्या धक्क्याचा सर्वात पहिला प्रोमो समोर आला आहे आणि या प्रोमो मध्ये या आठवड्यातील चर्चेत असलेला विषय हाताळला गेला असल्याचं पाहायला मिळतंय. (Bigg Boss Marathi Season 5 new promo)
भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुख आर्याला जेलमधून बाहेर बोलावतात. आणि असं म्हणतात की, “तुम्ही स्वतःला काय समजता. तुम्हाला राग आला तर तुम्ही कोणावरही हात उचलता. आर्या तुम्ही जे केलं १००% जाणून बुजून केलं होतं. मी ‘बिग बॉस’ला विनंती करतो की, कृपया त्यांनी आपला निर्णय सांगावा”. या आठवड्यात जादुई टास्क दरम्यान आर्या व निक्की यांच्यात झालेली धक्काबुक्की यामुळे आर्याचा राग अनावर झाला. आणि आर्याने निक्कीच्या कानाखाली लगावली. या आर्या कडून घडलेल्या चुकीला रितेश देशमुखने जाणून बुजून केलं असल्याचं म्हटलं.
आर्याने कानाखाली मारल्यानंतर निक्कीने ‘बिग बॉस’कडे तक्रार करत याबाबतचा न्याय मागितला. त्यामुळे ‘बिग बॉस’ यांनी घरातील सगळे कॅमेरे चेक करत नेमकं काय घडलं याचा आढावा घेत मोठी घोषणा केली असल्याचे पाहायला मिळाले.बिग बॉस’ म्हणाले, “आर्या आणि निक्कीमध्ये झालेली धक्काबुक्की व नेमकं काय घडलंय याच्या सगळ्या क्लिप्स आम्ही पडताळून पाहिल्या आहेत. दोघींमध्ये धक्काबुक्की होऊन आर्याने निक्कीला कानाखाली मारली आहे. हे कृत्य निंदनीय आहे.
त्यामुळे याची शिक्षा म्हणून आर्याला जेलमध्ये टाकावं आणि या प्रकरणाचा अंतिम निर्णय भाऊच्या धक्क्यावर घेण्यात येईल”. आता समोर आलेला आहे रितेश देशमुख काय आहे ते सांगा त्यामुळे आर्याला नेमकी काय शिक्षा होणार आर्या घरातून बाहेर जाणार नाही तर काही मी आर्या च वागणं चुकीचं होतं मात्र ते मुद्दाम जाणून केलं नसल्याचे म्हटलं.