‘बिग बॉस मराठी’च्या नव्या पर्वाचा सातवा आठवडा सुरु असून या पर्वात स्पर्धक मंडळी तुफान राडे करताना दिसत आहेत. टोकाच भांडण आता मारामारी पर्यंत येऊन पोहोचलेल पाहायला मिळतंय. मात्र ‘बिग बॉस’च्या घरात एखाद्या स्पर्धकाला हिंसा करणं हे अत्यंत चुकीच आणि निंदनीय आहे. नियमानुसार हा प्रकार करणे नियमाचे उल्लंघन आहे हे साऱ्यांनाच माहित आहे. अशातच ‘बिग बॉस’च्या घरात एका घडलेल्या घटनेने साऱ्यांचे लक्ष वेधलं आहे. ही घडलेली घटना म्हणजेच ‘जादुई टास्क’ दरम्यान निक्की व आर्या यांच्यात झालेली मारामारी अत्यंत निंदनीय होतो. (Bigg Boss Marathi Season 5)
निक्की व आर्या यांनी टास्क दरम्यान एकमेकांशी हुज्जत घातली आणि या दरम्यान आर्याचा राग अनावर झाला. आणि तिने तिच्या सणसणीत कानाखाली लगावली. जादुई टास्क दरम्यान वर्षा उसगांवकर, जान्हवी किल्लेकर, अंकिता वालावलकर हे सगळे स्पर्धक हिऱ्याची राखण करत असताना निक्की मध्ये येते. तेव्हा आर्या तिला अडवण्याचा प्रयत्न करते. निक्कीला आर्या खेळूच देत नाही त्यावेळेला निक्कीसुद्धा जोर लावत आर्याला धक्का मारते. या धक्काबुक्की मध्येच आर्याचा पारा सुटतो आणि ती निक्कीच्या थोबाडीत लगावते. त्याच वेळेला अरबाज, वैभव, निक्की सगळेच ओरडत घराबाहेर जातात आणि सांगतात की, ‘बिग बॉस’ आर्याने थोबाडीत मारली.
निक्कीही संताप व्यक्त करत म्हणते, ‘बिग बॉस’ आर्याने माझ्या कानाखाली मारली आहे. हे अत्यंत चुकीचे आहे. तर हिला आताच्या आता घराबाहेर काढा नाही तर मला तरी काढा, असं म्हणत निक्कीला अश्रू अनावर होतात. तर आर्याची ही चूकच झालेली असते. आर्याने संताप व्यक्त करत निक्कीच्या कानाखाली लावली हे अत्यंत चुकीचं झालं. ‘बिग बॉस’ने हा खेळ तिथेच थांबवला आणि कॅप्टनसी टास्क रद्द केला. त्यानंतर ‘बिग बॉस’ने सगळ्या स्पर्धकांना लिविंग एरियामध्ये बोलावलं आणि ही घटना अत्यंत निंदनीय असल्याचे सांगितलं. आर्याला शिक्षा म्हणून ‘बिग बॉस’ यांनी जेलमध्ये राहण्यास सांगितले. आर्या या आठवड्यापर्यंत जेलमध्ये जाईल आणि भाऊच्या धक्क्यावर आर्याला शिक्षा मिळेल असे जाहीर केलं.
सर्व सदस्य लिव्हिंग एरियामध्ये बसलेले असतात. तेव्हा आर्या आणि निक्कीमध्ये हातापायी होत ‘बिग बॉस’च्या घराच्या नियमांचं उल्लंघन झालं असल्याकारणाने याचा अंतिम निर्णय भाऊच्या धक्क्यावर घेतला जाईल, असं बिग बॉस सांगतात. तोवर आर्याला या आठवड्यात जेलची शिक्षा दिली जाते. या सगळ्यामुळे कॅप्टन्सी कार्य रद्द होतं. आर्याने निक्कीला मारल्याबद्दल इतर सदस्य चर्चा करत असतात. ‘बिग बॉस’ कॅप्टन सूरजला आर्याला जेलमध्ये बंदिस्त करायला सांगतात. अभिजीत आणि अंकिता, आर्याची समजूत काढतात.