सध्या मलायका अरोरा वडिलांच्या निधनामुळे खूप दु:खी आहे. बुधवारी तिचे वडील अनिल मेहता यांनी राहत्या घराच्या बाल्कनीमधून उडी मारुन आत्महत्या केली. निधनाची बातमी समजताच पुण्यामध्ये असलेली मलायका त्वरित दाखल झाली. ती जेव्हा घरी आली तेव्हा तिची अवस्थादेखील खूप वाईट झाली असल्याचेही दिसून आले होते. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. याचवेळी तिची बहीण अमृता आरोरादेखील दिसून आली होती. अनेक बॉलिवूड कलाकार मलायकाला धीर देण्यासाठी उपस्थित राहिले होते. (malaika arora father postmortem report)
मलायकाच्या वडिलांच्या मृत्यूनंतर लगेचच त्यांचा मृतदेह भाभा रुग्णालयात हलवण्यात आला होता. तिथे त्यांचे पोस्टमॉर्टम करण्यात आले होते. आता याचा अहवाल समोर आला आहे. यामध्ये त्यांच्या निधनाचे कारण समोर आले आहे. ‘न्यूज १८’च्या अहवालानुसार बुधवारी रात्री ८ वाजता त्यांचे पोस्टमॉर्टम करण्यात आले होते. आता कारण समोर आले असून या रिपोर्टमध्ये शरीरात व शरीरावर खूप जखमा झाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आहे. त्यामुळे आता यामध्ये अजून कोणते खुलासे होणार? यावर आता सगळ्यांचे लक्ष आहे.
‘आयएएनएस’च्या रिपोर्टनुसार, आत्महत्येच्या काही तासांपूर्वी त्यांनी मलायका व अमृता यांना फोन करुन, “मी खूप थकलो आहे” असं सांगितलं होतं. दरम्यान मलायकानेदेखील वडिलांसाठी एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये तिने लिहिले की, “आम्ही अत्यंत दु:खी मनाने घोषणा करत आहोत की आमचे प्रिय वडील अनिल मेहता आता आमच्यात राहिले नाहीत. तो एक सौम्य आत्मा, एक चांगला पिता, एक प्रेमळ पती आणि आमचा सर्वात चांगला मित्र होता”.
मलायकाने पुढे लिहिले की, “आम्ही गमावलेल्या गोष्टींमुळे आमचे कुटुंब काळजीमध्ये आहे, त्यामुळे मी माध्यमांना व माझ्या हितचिंतकांना विनंती करते की, त्यांनी आमच्या गोपनीयतेची काळजी घ्यावी. कारण आमच्यासाठी हा कठीण काळ आहे. आम्ही तुमची समज, समर्थन आणि आदर याला प्रोत्साहन देत आहोत”. मात्र अजून त्यांच्या रिपोर्टमध्ये काय असणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.