‘बिग बॉस मराठी’ची सध्या तुफान चर्चा सुरु असलेली पाहायला मिळत आहे. ‘बिग बॉस’च्या घरात स्पर्धकांमध्ये राडे, हाणामारी, भांडण, प्रेम, मैत्री पाहायला मिळाली. ‘बिग बॉस मराठी’च्या घरात अगदी पहिल्या दिवसापासून जान्हवी किल्लेकर व निक्की तांबोळीमध्ये मैत्री पाहायला मिळाली. सुरुवातीला ही मैत्री अगदी फुलत गेलेली दिसली मात्र कालांतराने त्यांच्या मैत्रीत फूट पडलेली दिसली. जान्हवी व निक्की यांच्यात तुफान वाद झाला आणि दोघीही एकमेकांच्या विरोधात खेळू लागले. निक्की कॅप्टन झाल्यानंतर तिची वागणूक बदललेली जान्हवीला खटकली. आणि यावरुन जान्हवीने अरबाजसह गॉसिप केलं. हे गॉसिप भाऊच्या धक्क्यावर पाहून निक्कीला खूप मोठा धक्का बसला. (Bigg Boss Marathi Season 5)
निक्कीला टिमने केलेली गद्दारी सहन झाली नाही म्हणून तिने टीम ए मधून एक्झिट घेतली. आणि तिने जान्हवीबरोबरची मैत्रीही तोडली. त्यानंतर निक्की व जान्हवी यांच्यात बरेचदा वाद झालेला पाहायला मिळाला. निक्की व जान्हवी यांच्यात झालेला वाद हा वाढत गेला. त्यानंतर निक्की व अरबाज एकत्र खेळ खेळताना दिसले. तर वैभव व जान्हवी हे त्यांच्यापासून वेगळे होत वेगळे होताना जिंकले. अशातच समोर आलेल्या प्रोमोमध्ये जान्हवी अरबाज व वैभवशी चर्चा करत संवाद साधताना दिसली.
जान्हवी अरबाज व वैभवबरोबर बोलत होती. यावर जान्हवी म्हणते, “तुम्ही दुसऱ्या राउंडमध्ये मला कॅप्टन्सीमधून उडवलं?”, असा प्रश्न विचारते. यावर अरबाज हो असं म्हणतो. त्यावर वैभव उत्तर देत, “तुला निक्कीला काढायचं आहे”, असं म्हणतो. वैभवच हे उत्तर ऐकून जान्हवीचा पारा चढतो. जान्हवी रागात म्हणते, “पण निक्कीला माझ्या कॅप्टन्सीबद्दल काय प्रॉब्लेम आहे?. मी स्वतंत्र खेळ खेळत आहे, हे माहीतच आहे. पण आमची कुठेतरी मैत्री होती ना. आणि आता यापुढे मी तुमच्या विरुद्धच खेळणार आहे तर आता आपण विरुद्धच खेळूया”.
जान्हवीने एकप्रकारे अरबाजला धमकी दिलेली पाहायला मिळत आहे. आता जान्हवीने स्वतंत्र खेळ खेळायला सुरुवात केली आहे. अरबाज व निक्की विरोधात आता जान्हवी कोणता खेळ खेळणार?, त्यांना ती पुरुन उरणार का हे पाहणं रंजक ठरेल.