‘बिग बॉस मराठी’च्या नव्या पर्वात स्पर्धकांचे सर्वत्र कौतुक होत असून घरातील सदस्यांचे भांडण, राडे, धमाल, मजा-मस्ती पाहायला मिळत आहेत.‘बिग बॉस मराठी’चे पाचवे पर्व सध्या चांगलंच गाजताना दिसत आहे. या घरातील टास्कमुळे व नवनवीन सदस्यांमुळे पहिल्या दिवसापासूनच ‘बिग बॉस’ची सर्वत्र चर्चा होताना पाहायला मिळत आहे. या घरात नेते, अभिनेते ते सोशल मीडिया इन्फ्ल्युएन्सर्स अशा अनेकांचा समावेश आहे. सूरज चव्हाण, निक्की तांबोळी, अरबाज पटेल, वैभव चव्हाण, आर्या जाधव, धनंजय पोवार, वर्षा उसगांवकर, पॅडी कांबळे, अंकिता वालावलकर या स्पर्धकांना ‘बिग बॉस’च्या घरात धुमाकूळ घालताना पाहणं रंजक ठरत आहे. (Bigg Boss Marathi season 5)
‘बिग बॉस मराठी’च्या घरात आता टीम ए व टीम बी मध्येही वादावादी सुरु असलेली पाहायला मिळत आहे. टीम ए मध्ये गेल्या भाऊच्या धक्क्यापासून वाद सुरु झालेले पाहायला मिळाले. तर टीम बी पात्र एकत्र दिसली. टीम ए मधून निक्की तांबोळीने एक्झिट घेतली असल्याचं पाहायला मिळालं. त्यामागोमाग निक्कीचा जिवलग अरबाज पटेलही निक्की सांगेल ती पूर्वदिशा असं म्हणत तिच्या मागेमागे करु लागला. ‘बिग बॉस मराठी’च्या घरात अगदी पहिल्या दिवसापासून अरबाज व निक्की यांची मैत्री पाहायला मिळाली.
अरबाज व निक्की यांच्यातील मैत्री कालांतराने इतकी वाढली की त्यांच्यात प्रेम फुलत गेलं. दोघांमधील प्रेम, जवळीक घरातील सदस्यांबरोबरच प्रेक्षकांनाही खटकू लागलं. नुकत्याच झालेल्या ‘बिग बॉस’मधील भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुखने अरबाज व निक्कीची शाळा घेतली. इतकंच नव्हे तर अरबाजला निक्कीच पायपुसणं म्हटलं. इतकं बोलूनही अरबाज काही निक्कीपासून दुरावला नाही. नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये अरबाज व निक्की एकत्र सोफ्यावर बोलत बसलेले असतात.
अरबाज व निक्की बोलत असतात ते पाहून घरातील इतर सदस्य अरबाजची फिरकी घेतात. पॅडी, अभिजीत, सूरज जर ते अरबाजच्या जागी असते तर त्यांची काय प्रतिक्रिया असती याबाबत गॉसिप केलं. पॅडी म्हणाला, “दोन दिवसांत ब्रेक अप”. तर अभिजीत म्हणाला, “जर ती आयुष्यात असती तर मीच आयुष्यात नसतो”. तर सूरज म्हणाला, “तू माझ्यासाठी खूप स्पेशल आहेस. माझ्या बच्चा हे घे स्पेशल चॉकलेट”, असं म्हणताच सगळे जण हसू लागतात.