रविवार, जून 8, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“तोच का?, मी कॅप्टनच्या लायकीची नाही का?”, सूरज कॅप्टन झाल्यानंतर Bigg Boss वरच भडकली जान्हवी, ढसाढसा रडत जाब विचारला अन्…

Saurabh Moreby Saurabh More
सप्टेंबर 6, 2024 | 5:07 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bigg Boss Marathi 5 new promo Janhavi Killekar angry on Suraj Chavan became the captain of the house.

Bigg Boss Marathi 5 मध्ये सूरजच्या कॅप्टन्सीबद्दल जान्हवीला वाटते jealousy?, थेट ‘बिग बॉस’लाच विचारलाअ जाब, नवीन प्रोमो व्हायरल

Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या ५ सप्टेंबरच्या एपिसोडमध्ये कॅप्टन पदाचे उमेदवार निवडण्यासाठी बसमध्ये बसण्याचा टास्क खेळवण्यात आला. त्यानंतर वर्षा उसगांवकर, अंकिता प्रभू वालावलकर, जान्हवी किल्लेकर आणि सूरज चव्हाण या कॅप्टन पदाच्या उमेदवारीसाठी पात्र ठरतात. अशातच आज सकाळी ‘कलर्स मराठी’ वाहिनीने शेअर केलेल्या नव्या प्रोमोमुळे घराचा नवा कॅप्टन ‘गुलीगत’ फेम सूरज चव्हाण झाल्याचे समोर आले. गुरुवारी पार पडलेल्या या टास्कमध्ये सूरज चव्हाण, वर्षा उसगांवकर, जान्हवी किल्लेकर आणि अंकिता वालावलकर हे चार सदस्य शेवटपर्यंत बसमध्ये टिकून राहिले. त्यामुळे हे चार जण कॅप्टन पदाचे उमेदवार ठरले होते आणि यातून सूरज हा घरचा नवीन कॅप्टन झाल्याचे समोर आले. (Bigg Boss Marathi 5 Janhavi Killekar angry

कॅप्टन्सी कार्यात सूरज चव्हाणने ‘झापुक झुपूक’ गेम करत बाजी मारली आणि तो आता ‘बिग बॉस मराठी’च्या घरातील नवीन कॅप्टन झाला आहे. यानंतर घरातील सदस्यांनी त्याचं अभिनंदन करत कौतुक केल्याचंही दिसत आहे. सूरजच्या या कॅप्टन्सीचा सर्वांनाच आनंद झाला आहे. त्यामुळे घरातील सदस्य “हमारा कॅप्टन कैसा हो, सूरज भाऊ जैसा हो”, अशा घोषणा देताना दिसत आहे. तसंच त्याचं अभिनंदन करत असल्याचेदेखील या प्रोमोमध्ये पाहायला मिळालं. मात्र त्याच्या या कॅप्टन्सीवर घरातील एक स्पर्धक नाराज आहे  आणि ही स्पर्धक म्हणजे जान्हवी किल्लेकर.

View this post on Instagram

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : “प्रेम खोटं, तिनेच त्याला गुंतवून ठेवलं आणि…”, निक्कीबरोबरच्या नात्यावर अरबाजच्या वडिलांचं मोठं भाष्य, म्हणाले, “कमिटेड असूनही…”

‘बिग बॉस मराठी’चा नवीन कॅप्टन सूरज झाल्याचे जान्हवीला पटलेले नाही आणि यामुळे तिने सूरजबद्दल राग व्यक्त केला आहे. कलर्स मराठीच्या सोशल मीडिया अकाऊंटद्वारे नुकताच एक प्रोमो प्रदर्शित करण्यात  आला आहे, ज्यातून तिच्या सूरजच्या कॅप्टन्सीबद्दलचा राग दिसून येत आहे आणि याबद्दल तिने थेट बिग बॉसलाच जाब विचारला आहे. या प्रोमोमध्ये ती बिग बॉसला जाब विचारत असं म्हणते की, “हा (सूरज) आता कॅप्टन्सीसाठी पात्र का आहे हे तुम्ही मला सांगा. तुम्हाला मनापासून वाटतं का? की मी कॅप्टन होण्याच्या लायकीची नाहीये. जे लोक सुधरण्याचा प्रयत्न करत आहेत ना त्यांना म्हणताय की तुम्ही सुधरलात तरी काही फायदा नाहीये. आम्ही तुमच्याशी तसंच वागणार. दुसरी अपेक्षाच काय करु शकते मी”.

आणखी वाचा – सूरज चव्हाण Bigg Boss चा कॅप्टन झाल्यानंतर प्रेक्षकांसह कलाकारही भारावले, म्हणाले, “झुकेगा नहीं, विषय हार्ड…”

दरम्यान, जान्हवीचा हा नवीन प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल होत असून अनेकांनी तिला सूरजच्या कॅप्टन्सीबद्दल असूया वाटत असल्याचे म्हटलं आहे. या नवीन प्रोमोखाली  नेटकऱ्यांनी “किती माज आहे हिला सुरज कँप्टन झालेल हिला पहावत नाही”, “शेपूट वाकडच राहणार”, “अरे यार आम्हाला वाटल ही सुधारली पण हिची ही नाटक आहेत”, “चार दिवस दिवस नीट वागणे आणि कायम नीट वागण्यात खूप फरक असतो” अशा अनेक कमेंट्स केल्या आहेत.

Tags: bigg boss marathi 5janhavi killekarSuraj Chavan
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
gayatri datar on suraj chavhan

"त्याला चांगलं खेळण्याची गरज", सूरज चव्हाणला गायत्री दातारचा सल्ला, म्हणाली, "पहिला चांगलं खेळायचा आता…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.