Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या नवीन पर्वात सध्या एक स्पर्धक सर्वांच्याच पसंतीस उतरताना दिसत आहे आणि हा स्पर्धक म्हणजे सूरज चव्हाण. आपल्या साध्या व सोप्या राहणीमानाने सूरजने घरातील सदस्यांबरोबरच घराबाहेरील प्रेक्षकांचीही मनं जिंकली आहेतव. ‘बिग बॉस’च्या घरात आल्यापासूनच सूरजने अनेकांची मनं जिंकली आहेत. सूरजचं या घरातील प्रत्येक स्पर्धकाबरोबर चांगलंच जमतं. या घरात त्याचे कुणाशीही मतभेद किंवा वाद नसून त्याने केलेल्या प्रत्येक कृतीचे कौतुक केलं जातं. घरात आल्यापासून तो ‘टीम बी’बरोबर राहत आहे. त्यामुळे या टीममधील सर्वांबरोबर त्याचं चांगलंच जमतं. अशातच मंगळवारच्या भागात पॅडी व सूरज यांचा खास बॉण्ड दिसून आला. (Bigg Boss Marathi 5 New Promo)
‘बिग बॉस मराठी’च्या घरात सूरजने सर्वांबरोबर चांगलाच बॉण्ड तयार केला आहे. घरातील प्रत्येक व्यक्तीबरोबरचा त्याचा बॉण्ड खास आहे आणि हे वेळोवेळी प्रेक्षकांना पाहायलादेखील मिळाले आहे. धनंजय, अभिजीत, पॅडी व अंकिता यांच्याबरोबर त्याचं खास नातं तयार झालं असून या प्रत्येकाबरोबरचे खास क्षण प्रेक्षकांनी अनुभवले आहेत. अशातच नुकत्याच आलेल्या नवीन प्रोमोमध्येदेखील पॅडी व सूरज यांची मजामस्ती पाहायला मिळत आहे. कलर्स मराठीच्या सोशल मीडिया अकाऊंटद्वारे हा पॅडी व सूरज यांचा नवीन प्रोमो शेअर करण्यात आला आहे.
आणखी वाचा – Navri Mile Hitlerla च्या सेटवर लीला झाली कॅमेरामन, स्वत:च शूट करत आहे मालिकेतील सीन, व्हिडीओ व्हायरल
या नवीन प्रोमोमध्ये वर्षा सूरजला जेवायला बोलवतात. तेव्हा पॅडी वर्षा यांना “एकट्यालाचं?” असा प्रश्न विचारतात. यावर वर्षा त्यांना “सॉरी पंढरीनाथ. जमलं तर मला माफ करा” असं म्हणतात. पुढे पंढरीनाथ “मला खूप वाईट वाटतं हो ताई. तुम्ही फक्त सूरजला हाक मारता”. यावर सूरज पॅडी यांना असं म्हणतो की, “का? जळताय माझ्यावर?” यानंतर पॅडी सूरजला असं म्हणतात की, “जा आता नाहीतर माझ्या छातीतली जळजळ वाढेल”. यावर सूरज त्यांना मस्करीत असं म्हणतो की, “जळू नका. करपून जाल. तोंड करपेल” असं म्हणतो.
बिग बॉस मराठीचा हा नवीन प्रोमो प्रेक्षकांनाही चांगलाच आवडला आहे. अनेकांनी लाइक्स व कमेंट्सद्वारे या व्हिडीओळा प्रतिसाद दिला आहे. अनेकांनी कमेंट्स करत सूरज व पॅडी यांची मैत्री आवडली असल्याचे म्हटलं आहे. पॅडी दादा व सूरज चव्हाण खूप छान मनोरंजन करत आहेत, या दोघांचा बॉण्ड खूपच छान आहे, सुरजभाऊ आणि पॅडीदादा भारी केमीस्ट्री” अशा अनेक कमेंट्स करत या व्हिडीओला प्रतिसाद दिला आहे.