बॉलिवूडमधील एक चर्चेत असलेलं कपल म्हणजे नतासा स्टॅनकोविक व हार्दिक पांड्या. काही दिवसांपूर्वीच नतासा व हार्दिक यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. घटस्फोटादरम्यान ही जोडी बरीच चर्चेत राहिलेली पाहायला मिळाली. घटस्फोट घेतल्यानंतर नताशा आपला मुलगा अगस्त्यबरोबर सर्बियाला निघून गेली. ३ ऑगस्टला नताशा पहिल्यांदा मुलगा अगस्त्यबरोबर मुंबईत आली होती. येथे आल्यानंतर नताशाने सर्वप्रथम तिचा मुलगा अगस्त्यला वडील हार्दिकच्या घरी सोडले असल्याचं समोर आलेल्या फोटोंवरुन कळतंय. (Natasa Stankovic News)
हार्दिकची वहिनी आणि त्याचा मोठा भाऊ कुणाल पांड्याची पत्नी पंखुरी शर्माने इन्स्टाग्राम स्टोरीवर एक सुंदर असा व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये अगस्त्य त्याच्या चुलत भावांबरोबर मजा करताना दिसत आहे. पंखुरीने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ती मुलांबरोबर क्वालिटी टाइम घालवताना दिसत आहे. ती ४ वर्षांच्या अगस्त्यला घेऊन गोष्टींचं पुस्तक वाचत आहे आणि अगस्त्यचा चुलत भाऊही त्याच्याबरोबर बसला आहे. हार्दिकपासून वेगळे झाल्यानंतर अगस्त्य त्याची आई नताशाबरोबर सर्बियामध्ये राहतो.
आणखी वाचा – लग्नासाठी तयार सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री, दोनवेळा घटस्फोट झालेल्या अभिनेत्याशी लग्नगाठ बांधणार
हार्दिक व नताशाचे मे २०२० मध्ये लग्न झाले. यानंतर दोघांनी १४ फेब्रुवारी २०२३ रोजी हिंदू व ख्रिश्चन रितीरिवाजानुसार लग्न केले. आता लग्नाच्या चार वर्षानंतर दोघेही वेगळे झाले आहेत. नताशाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर करत लिहिले, “चार वर्षांनंतर, मी आणि हार्दिकने एक संयुक्त निवेदन जारी केले आहे आणि आम्हा दोघांसाठी हा एक कठीण निर्णय असल्याचे त्यांनी या पोस्टमध्ये नमूद केले आहे. त्यांचा मुलगा अगस्त्यचे ते दोघे सहपालक राहतील, असंही त्यांनी म्हटलं.
काही दिवसांपूर्वी एका रिपोर्टमध्ये असा दावा करण्यात आला होता की नताशा हार्दिक पांड्याबरोबर ताळमेळ राखू शकत नसल्याने त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. टाईम्स नाऊच्या रिपोर्टनुसार, हार्दिक स्वतःवर खूश आहे, आणि तो एकटाच खूप खुश असतो. तिने हार्दिकला शो-ऑफ करतो असेही म्हटले होते.