शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

प्रसाद ओकला लेकाने २२व्या वर्षी गिफ्ट केली महागडी कार, मंजिरी ओक भावुक, म्हणाली, “आज बाबाच्या चेहऱ्यावर…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
सप्टेंबर 3, 2024 | 3:57 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
prasad oak and manjiri oak children

मराठी अभिनेता प्रसाद ओकला त्याच्या लेकाने दिली महागडी कार, मंजिरीची पोस्ट व्हायरल

अभिनेता प्रसाद ओक व त्याची पत्नी मंजिरी ओक नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. प्रसाद हा मराठी मनोरंजन सृष्टीतील आघाडीचा अभिनेता व दिग्दर्शक आहे. तर मंजिरीनेदेखील काही वर्षांपूर्वीच निर्मितीक्षेत्रात पदार्पण केलं आहे. दोघांनीही शून्यातून आपल्या संसाराची सुरुवात केली आहे. तसेच ते दोघे एकमेकांबरोबर इन्स्टाग्रामवर धम्माल व्हिडीओ देखील बनवताना दिसतात. सोशल मीडियावर प्रसाद व त्याची पत्नी नेहमीच सक्रिय असतात.अशातच मंजिरीने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन शेअर केलेल्या एका पोस्टने साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. या पोस्टमध्ये मंजिरीने तिच्या लेकांचं कौतुक केलेलं पाहायला मिळत आहे. (prasad oak and manjiri oak children)

मंजिरी व प्रसादला दोन मुलं आहेत. मंजिरीने तिच्या लेकाचं कौतुक करत त्याचा अभिमान असल्याची एक पोस्ट शेअर केली आहे. मंजिरीने पोस्ट शेअर करत सार्थकचा सायकलबरोबरचा एक फोटो पोस्ट केला आहे. तर दुसऱ्या फोटोमध्ये सार्थक व प्रसाद एका महागड्या गाडीबरोबर उभे असलेले दिसत आहेत. ही पोस्ट शेअर करत मंजिरीने असं म्हटलं आहे की, “सार्थक, जेव्हा गोष्ट तुमच्या बाबतीत असायची तेव्हा आपला बाबा तसा थोडा भित्राच होता अजूनही आहे. तुझ्या दुसऱ्या वाढदिवसाला म्हणजे ३ सप्टेंबर २००२ला मी मागे लागले म्हणून बाबाची तयारी नसताना त्याने तुला ही सायकल सरप्राइज गिफ्ट म्हणून आणली होती, पण त्याला काळजी होती की तू ती चालवताना पडलास तर?, तुला लागलं तर? म्हणून कित्येक दिवस त्याने तुला ती सायकल घराखाली नेऊ पण दिली नाही”.

आणखी वाचा – खास सरप्राइज, जंगी स्वागत अन्…; खूप दिवसांनी बायको घरी येताच सिद्धार्थ चांदेकरचा आनंद गगनात मावेना, फोटो व्हायरल

View this post on Instagram

A post shared by Manjiri Oak (@manjiri_oak)

पुढे तिने लिहिलं आहे की, “अर्थात आपण हळूच तो नसताना सायकल चालवायला जायचो. त्यावर बसायचं कसं हे पण तुला कळत नव्हतं. मात्र तू बाबाला ती पहिल्यांदा चालवून दाखवल्यानंतरचा जो आनंद तुझ्या चेहऱ्यावर होता अगदी तोच व तसाच अगदी लहान मुलासारखा आनंद आज बाबाच्या चेहऱ्यावर आहे. त्याचं कारण म्हणजे, आज २२ वर्षांनी ३ सप्टेंबर २०२४ ला तू बाबाला ही मोठ्ठी गाडी सरप्राइज गिफ्ट दिलीस. मी नको म्हणाले तर तू म्हणालास की, बाबा स्वतःहून कधीच स्वतःसाठी मोठी गाडी घेणार नाही. त्याऐवजी छोटं घर घेऊ असंच म्हणेल. माझ्याकडे शब्द नाही आहेत सार्थक. फक्त एवढंच सांगते की, खूप खूप अभिमान वाटतो तुझा व मयांकचा. खूप मोठा हो. स्वामी तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करोत. तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. “B”est “M”any “W”ishes “, असं कॅप्शन देत मंजिरीने या खास क्षणाची पोस्ट शेअर केली आहे.

आणखी वाचा – “आधी घनःश्याम नंतर डीपी बाहेर पडेल”, मराठी अभिनेत्याच्या कमेंटवर भडकले प्रेक्षक, म्हणाले, “हे तुम्ही सांगू नका आणि…”

प्रसादचा एक मुलगा सार्थक शिक्षणानिमित्त परदेशात असतो. काही दिवसांपूर्वी त्याचा पदवी प्रदान सोहळा पार पडला. लेकाच्या या सोहळ्यात हजेरी लावण्यासाठी दोघेही परदेशात गेले होते. सार्थकने ‘बीए इन इंटरनॅशनल मार्केटिंग मॅनेजमेंट’ यामध्ये पदवी मिळवली आहे. त्याच्या या पदवी प्रदान सोहळ्याचा अभिमानाचा क्षण प्रसाद व मंजिरी यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला होता.

Tags: prasad oak & manjiri oakprasad oak and manjiri oak childrenprasad oak son
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
"फुटेजसाठी भांडण करते, गरीब घनःश्याम", जान्हवी-छोटी पुढारीने एकमेकांची लाज, अक्कल काढल्यानंतर प्रेक्षक म्हणाले, "तुला जेलमध्येच..." | janhvi killekar ghanshyam darwade fight

"फुटेजसाठी भांडण करते, गरीब घनःश्याम", जान्हवी-छोटी पुढारीने एकमेकांची लाज, अक्कल काढल्यानंतर प्रेक्षक म्हणाले, "तुला जेलमध्येच…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.