शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

तरुण वयातच नवऱ्याला गमावलं, ५४व्या वर्षीही एकटीच राहते सुप्रसिद्ध अभिनेत्री, आता जगत आहे असं आयुष्य

Saurabh Moreby Saurabh More
ऑगस्ट 31, 2024 | 12:58 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Siddharth Ray's wife Shantipriya Struggle

‘अशी ही बनवाबनवी’ फेम सिद्धार्थ रेची पत्नी शांतीप्रिया आता काय करते? जाणून घ्या...

‘अशी ही बनवाबनवी’ हा चित्रपट आणि यातील कलाकार आजही प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हसू फुलवण्यात यशस्वी आहेत. या चित्रपटातील प्रत्येक कलाकाराने त्यांच्या भूमिकेला न्याय दिला आणि त्या भूमिका अजरामर केल्या. ‘अशी ही बनवाबनवी’ या चित्रपटात दिग्गज कलाकारांबरोबर प्रेक्षकांना हसवणारे सिद्धार्थ हे अल्पायुषी ठरले. वयाच्या अवघ्या चाळीसाव्या वर्षी त्यांनी या जगाचा निरोप घेतला. ८ मार्च २००४ साली सिद्धार्थ यांना हृदयविकाराचा झटका आला त्यातच त्यांचा मृत्यू झाला. सिद्धार्थच्या अकाली निधनाने त्यांची पत्नी शांतीप्रिया यांना मोठा धक्का बसला आणि या नंतर ती बॉलिवूडपासून दूर गेली. मात्र आता शांतीप्रिया कुठे आहे आणि ती काय करत आहे? माहीत आहे का? चला जाणून घेऊया… (Siddharth Ray Wife Shantipriya Struggle)

अभिनेत्री शांतीप्रियाने ९० च्या दशकाच्या सुरुवातीला सुपरस्टार अक्षय कुमारबरोबर सिनेक्षेत्रात पदार्पण केले. पदार्पणातच ती प्रसिद्धी झोतात आली. शांतीप्रियाने १९९१ मध्ये अक्षय कुमारबरोबरच्या ‘सौगंध’ या चित्रपटातून तिच्या करिअरची सुरुवात केली होती. अक्षयचाही हा पहिलाच पदार्पणाचा चित्रपट होता. पदार्पणाच्या वेळी शांतीप्रिया अवघ्या २२ वर्षांची होती. हिंदी चित्रपटांव्यतिरिक्त त्यांनी तमिळ, तेलुगू व कन्नड चित्रपटांमध्येही काम केले. ती अनेक चित्रपटांमध्ये दिसली. पण तिला तिच्या काळातील प्रसिद्ध अभिनेत्रींसारखे यश मात्र मिळू शकले नाही. नंतर अभिनेत्रीने सिद्धार्थ रेशी लग्न केले. मात्र सिद्धार्थच्या अकाली निधनाने शांतीप्रिया यांना मोठा धक्का बसला आणि त्या सिनेक्षेत्रातून काहीशा लांब गेल्या.

View this post on Instagram

A post shared by shanthi priya (@shanthipriya333)

आणखी वाचा – इंडस्ट्रीमध्ये चाललंय तरी काय?, अभिनेत्रींबरोबरच पुरुष कलाकारांचेही होत आहे लैंगिक शोषण, लोकप्रिय अभिनेत्याचे गंभीर आरोप

२२ सप्टेंबर १९६९ रोजी जन्मलेल्या शांतीप्रियाचे वयाच्या ३० व्या वर्षी १९९९ मध्ये सिद्धार्थ रेशी लग्न झाले. मात्र, लग्नानंतर पाच वर्षांनी २००४ मध्ये सिद्धार्थचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. सिद्धार्थच्या मृत्यूच्या वेळी शांतीप्रिया फक्त ३५ वर्षांची होती. शांतीप्रियाने सिद्धार्थ रेशी लग्न केले. शाहरुख खानच्या ‘बाजीगर’ या हिट चित्रपटासाठी सिद्धार्थची आठवण होते. पतीच्या निधनाने ही अभिनेत्री उद्ध्वस्त झाली आणि बॉलिवूडपासूनही काहीशी दूर राहिली.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : “त्याच्यावर माझा विश्वासच नाही” अंकिता-अभिजीतमध्ये फुट, कशावरुन झाले मतभेद?

काही काळानंतर ती ‘माता की चौकी’ या मालिकेत दिसली. अभिनेत्रीने २०२२ मध्ये आलेल्या सुनील शेट्टीच्या ‘धारावी बँक’ या वेबसीरिजद्वारे पुनरागमन केले. दरम्यान, शांतीप्रियाने ‘फुल और अंगार’, ‘मेहेरबान’, ‘मेरा सजना साथ निभाना’, ‘वीरता’, ‘अंधा इतंकाम’, ‘हॅमिल्टन पॅलेस’, ‘सौगंध’, ‘इक्के पे इक्का’ या चित्रपटात अभिनेता अक्षय कुमार, मिथुन चक्रवर्ती यासारख्या आघाडीच्या अभिनेत्यांबरोबर काम केले आहे. याशिवाय ती सोशल मीडियावरही सक्रीय असते.

Tags: Shantipriya Struggle NewsSiddharth RaySiddharth Ray Wife Shantipriya
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Star Pravah Muramba serial fame actor Shashank Ketkar shared a angry post about river pollution in India

“देव येऊनच स्वच्छ करतील”, नदीतील कचरा पाहून भडकला शशांक केतकर, म्हणाला, “सण महत्त्वाचे पण…”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.